शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 28, 2014 00:40 IST

पिंपरी-चिंचवड शहरात विजेच्या कडकडाटासह मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात विजेच्या कडकडाटासह मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. बिजलीनगरसह काही ठिकाणी झाडे पडली तर डुडुळगाव, चºहोली परिसरात घरावरील पत्रे उडून गेले. मंगळवारी सकाळपासूनच वातावणात उकाडा जाणवत होता. दुपारी एकच्या सुमारास ढग भरले होते. सव्वा एकच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाने जोर धरला. विजेचा कडकडाट आणि वार्‍यासह कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सुट्टीचे दिवस असल्याने अनेकजण कुटुंबासह फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच फजिती झाली. पावसापासून संरक्षण करण्यासाठी कोणतेही साहित्य सोबत नसल्याने भिजण्याशिवाय पर्याय नव्हता. वाहनांमध्ये पाणी गेल्याने अनेक ठिकाणी वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या. उकाडा जाणवत असतानाच अचानक आलेल्या पावसात अनेकांंनी भिजण्याचा आनंदही लुटला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साठले होते. डांबरी रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्याने काही ठिकाणी मोठी डबकी साठली होती. बिजलीनगर चौकात पावसामुळे एका मोटारीवर झाड कोसळले. यामध्ये मोटारीचे नुकसान झाले. सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या पावसामुळे शहरवासीयांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. मोशी : दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दुपारनंतर पडलेल्या मुसळधार पावसाने थोडासा दिलासा दिल्याचे चित्र दिसून आले. सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकत होता. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झाले होते. मंगळवार दुपारी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मोशी, डुडुळगाव परिसरातील रहिवाशी सुखावले. (वार्ताहर)