शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव परिसरात गारांसह जोरदार पाऊस

By admin | Updated: May 20, 2014 04:50 IST

तळेगाव व परिसरात या मोसमात झालेल्या पहिल्या वादळी पावसात बरेच नुकसान केले. गारांसह पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांची तारांबळ झाली

तळेगाव स्टेशन : तळेगाव व परिसरात या मोसमात झालेल्या पहिल्या वादळी पावसात बरेच नुकसान केले. गारांसह पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांची तारांबळ झाली. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड व पश्चिम मावळातील भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला. परंतु, तळेगाव व परिसरात आतापर्यंत चार-पाच वेळा पावसाने हुलकावणी दिली. सोमवारी अर्धा तास पावसाने गारांसह झोडपले. बरीचशी झाडे उन्मळून पडली. इंदोरी येथील मारुती मंदिराजवळील वडाची फांदी तुटून चाकण-तळेगाव रस्त्यावर पडल्याने गावातून जाणार्‍या रस्त्यावरील वाहतुकीस चांगलाच अडथळा झाला. काही घरांचे व गोठ्यांचे पत्रे वादळाने उडाले. सांगुर्डी, कान्हेवाडी, इंदोरी, येलवाडी, सुदुंबरे, वराळे, माळवाडी शिवारात उन्हाळी बाजरी काढणी चालू असल्याने कणसे भिजली. काही शेतातील बाजरीचे उभे पीक आडवे झाले. सोसाट्यांच्या वार्‍यामुळे शिवारातील कैर्‍यांचा व आंब्यांचा सडा शेताशेतात पसरला आहे. अद्याप उघड्यावर साठविलेली वैरण (गवत, कडबा, पेंढा वगैरे) भिजून मोठे नुकसान झाले आहे. अद्याप काढलेले कांदे शेतातच साठविल्याने त्यांचेही भिजून नुकसान झाले. या पावसाने हवेत मात्र गारवा आला आहे. उर्सेत बाजरी पीक आडवे उर्से : जोरदार वारा व पडलेल्या मुसळधार पावसामुळे पवन मावळातील बाजरीच्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. आठवडाभरापासून हवामानात चांगलाच उकाडा होत असल्याने दुपारी चारच्या दरम्यान पुन्हा जोरदार वार्‍यामुळे शेतकर्‍यांची चांगलीच पळापळ झाली. हाताशी आलेले बाजरीचे पीक या पावसामुळे काही ठिकाणी जमिनीवर झोपले. टॉमेटो, वांगी व इतर पिकांना अशाच प्रकारे एक, दोनदा पाऊस पडल्यास आलेले पीक हातची निघून जातील, अशी चिंता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.