शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती, इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस

By admin | Updated: June 3, 2016 00:45 IST

बारामती शहरासह इंदापूर परिसराला गुरुवारी (दि.२) मेघगर्जनेसह सुमारे दीड तासाहून अधिक काळ मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाला सुरुवात झाली

बारामती : बारामती शहरासह इंदापूर परिसराला गुरुवारी (दि.२) मेघगर्जनेसह सुमारे दीड तासाहून अधिक काळ मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. बारामतीत मात्र, पहिल्याच पावसात नगरपालिकेच्या नालेसफाई पोलखोल झाली.या पावसामुळे बारामती शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. शहरातील नाल्यांची तसेच भूमिगत गटारांची सफाई न झाल्याने काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. शहरातील नगरपालिकेच्या समोरचा रस्ता, इंदापूर रस्ता, इंदापूर चौक, तांदूळवाडी वेस आदी भागांत पावसाचे पाणी साचले होते. तर, तांदूळवाडी भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. शहरातील वसंतराव पवार मार्गावर भूमिगत गटारांची सफाई न झाल्याने ड्रेनेजमधून पाणी उफाळून बाहेर येत होते. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिक तसेच वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तांदूळवाडी वेस येथील कदम चौकापासून महावीर पेठ रस्त्यापर्यंत ठिकठिकाणी पावसाची तळी साठली होती. नाले सफई न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा मिळाली नाही. तर, कदम चौकातील दुकानांमध्येही पाणी शिरले. कऱ्हा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना गुडघ्याएवढे पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत होती. गुरुवार हा बाजार दिवस असल्याने परिसरातून आलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांची पावसाने त्रेधा उडाली. त्यानंतर ८.३० नंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शहरातील उकाडाच गायब झाला.सविस्तर वृत्त / पान २दोघे जण चेंबरमध्ये पडलेबारामतीचा आज आठवडे बाजार असल्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी गावोगावच्या ग्रामस्थांची गर्दी होते. जवळपास दीड तास पावसाने झोडपल्याने भाजीपाला विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. मंडईत पाणी साठले. ते पाणी चेंबरमधून जाण्यासाठी झाकण काढले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी आलेले दोघेजण चेंबरमध्ये पडले. सुदैवाने त्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले.