शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी शरीर काळाची गरज

By admin | Updated: May 8, 2017 03:31 IST

निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. सर्वसाधारणपणे लोकांमध्ये आरोग्य सेवेशी संबंधित विविध पैलूंवर जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ  अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी व्यक्त केले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाच्या लवळे कॅम्पस येथे जागतिकीकरणावरील आरोग्य सेवेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप नुकताच झाला. यावेळी जेठमलानी यांच्यासह जागतिक आरोग्य संस्थेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. हेंक बेकदम, फिनलँड दुतावासातील नवी दिल्लीतील राजदूत नीना वास्कुनलाहती, सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार उपस्थित होते.समारोपाप्रसंगी पदवीप्रदान समारंभही पार पडला. भारत आणि परदेशातून आरोग्यसेवेशी संबंधित जवळपास १००० ते १२०० व्यावसायिक, रुग्णालये आणि आरोग्यसेवा व्यवस्थापन, न्यायवैद्यक पद्धती, वैद्यकीय विमा, जनरल प्रॅक्टिशनर्स, प्रशासक, फार्मा विभागाचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शेवटच्या सत्रात लिंडा रॉबटसन, डॉ. शिरशेंदू मुखर्जी, डॉ. श्रीकांत, डॉ. के. एस. सेठी, डॉ. आर. नागरत्ना, डॉ. डी. सी. कटोच आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.भारत हा लसींच्या निर्मितीसाठी प्रमुख केंद्र मानले जाते. सध्याच्या काळात जगासमोर संक्रमक आजारांचे आव्हान उभे आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. आरोग्य सेवेवरील खर्चामुळे ६० दशलक्ष जनता दारिद्र्यरेषेखाली उतरली आहे. वाढत्या प्रदूषणाची दखल घेणेही गरजेचे आहे.- हेंक बेकदम