शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मैलापाण्यामुळे केशवनगरमध्ये आरोग्याच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

आनंदनगर परिसरातील नागरिकांनी गेल्या चार वर्षांपासून तोंडी, लेखी अर्जांद्वारे पुणे महानगरपालिकेशी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांना केवळ पोकळ आश्वासने ...

आनंदनगर परिसरातील नागरिकांनी गेल्या चार वर्षांपासून तोंडी, लेखी अर्जांद्वारे पुणे महानगरपालिकेशी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांना केवळ पोकळ आश्वासने दिली जातात परंतु कोणीही याची गांभीर्याने दखल घेत नाही.

नागरिकांची प्रतिक्रिया

अशोक भुजबळ- ही समस्या तीन वर्षांपासून आहे. चेंबर ब्लॉक होत असल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाणी रोडवरव येत आहे. येथील नेते व बांधकाम व्यावसायिक यास जबाबदार आहेत. आम्ही लोकवर्गणीतून ड्रेनेज लाईन केली आहे. लोणकरवस्ती ते ग्राफिटी, गणेश महानगरी सोसायटीचे १८ इंची ड्रेनेज आनंदनगरच्या ८ इंची ड्रेनेजला जोडले आहे. पाच वर्षांपासून स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींना सांगितले पण कामे होत नाहीत. मनपा येऊन चार वर्षे झाली. अधिकारी, नगरसेवक व आमदार यांना भेटून निवेदन दिलेत. परंतु त्यांनी फक्त आश्वासने दिलीत. पुणे मनपाला समस्या सोडविता येत नसतील तर त्यांनी चार वर्षाचा मिळकतकर परत करावा. जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही सर्व नागरिक आंदोलन करू.

शबाना शेख-आम्ही पुणेमहानगरपालिका वाढीव कर भरत आहे. स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, रस्ता व्यवस्था नियोजन अजिबात होत नाही. आजारपणाला पैसा कोठून आणायचा? कर का द्यायचा?आमचा प्रश्न सोडवा. आम्ही आता कोणाकडे दाद मागणार.

अनिल भांडवलकर – तत्कालीन केशवनगर ग्रामपंचायत सदस्य व बांधकाम व्यावसायिक यांच्या चुकीच्या नियोजनामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा निर्माण झालेला मोठा प्रश्न विद्यमान सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन व पुणे महानगरपालिकाने येथील रहिवाशांचा कर घेऊन येथेच तत्काळ २४ इंच गटार लाईन टाकून द्यावी व होणारे आंदोलन टाळावे.

फोटो ओळः केशवनगर येथील आनंदनगर परिसरात ड्रेनेज चेंबरमधून मैलामिश्रित दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.