शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत लसीकरण केंद्रावर राडा; आरोग्य कर्मचारी आणि नागरिक आमने सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 20:30 IST

लसीकरणात अन्याय झालेली गावे उपमुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार 

सांगवी : कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. तर परिस्थिती हाताळताना डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना सांगवीतील काही पदाधिकाऱ्यांनी थेट दम भरला. याचवेळी सांगवी आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखालील इतर गावांत पहाटेपासून रांगेत थांबून देखील लस उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी आणि नागरिकांत वादावादी होत आहे. यामुळे आता इतर गावातील लस न मिळालेले नागरिक थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.

बारामतीचे आरोग्य प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यातच ताळमेळ नसल्याने केंद्रावर रोज मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. गर्दी व गोंधळामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांना पाचारण करून बंदोबस्तात लसीकरण करण्यात आले. ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधी, तरुणांची लसीकरण कर्मचाऱ्यांना दमदाटी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. तर मध्येच येऊन रजिस्ट्रेशन करत असल्याने अवघ्या काही मिनिटात कुपन संपल्याचे सांगितल्याने रांगेतील नागरिकांनी एकच गदारोळ करत संतप्त प्रतिक्रिया दिली.

अनेक पुरुष व महिला रांगेत उभे राहूनही ज्यांना टोकन मिळाले नाही, ते लोक आक्रमक झाले. यामुळे एकच गदारोळ उडाला. नेमके याचवेळी अनेक नागरिकांना दोन टोकन देण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली. रांगेतील काही नागरिक आणि लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांत वादावादी सुरू झाली. 

मदतकार्याच्या नावाखाली ओळखीच्या लोकांचं रजिस्ट्रेशन ....आरोग्य केंद्रात काही तरुण व पदाधिकारी मदत कार्याच्या नावाखाली घुसखोरी करून आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून ओळखीच्या चार ते पाच व्यक्तींचे एकाच वेळी रजिस्ट्रेशन करून कुपन घेऊन लस दिली जात आहे. याकडे मात्र पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र, लसीकरणापासून वंचित राहू लागले आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या