शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य, शिक्षण हेच जीवनाचे महत्त्वाचे पैलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:11 IST

पुणे : उत्तम आरोग्य ही चांगल्या जीवनाची पहिली पायरी असून, चांगल्या शिक्षणामुळेच माणसाला आरोग्यभान येते. कोरोनाच्या संकटाने हे अधोरेखित ...

पुणे : उत्तम आरोग्य ही चांगल्या जीवनाची पहिली पायरी असून, चांगल्या शिक्षणामुळेच माणसाला आरोग्यभान येते. कोरोनाच्या संकटाने हे अधोरेखित केले आहे. त्यामुळे आरोग्य आणि शिक्षण हेच जीवनाचे महत्त्वाचे पैलू आहेत, असे मत राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजेश टोपे बोलत होते. त्या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

कोरोना संकटातील भारती हॉस्पिटलचे कार्य उल्लेखनीय आहे, असे नमूद करून राजेश टोपे म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार झाला.

डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, उच्च शिक्षणाचा विस्तार होत असताना गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. चांगल्या शिक्षकांचा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गुणवत्तावाढीसाठी करणे गरजेचे आहे.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, विद्यापीठात संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राध्यापकांमध्ये ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती असायला हवी. भविष्यात मायक्रोलर्निंग आणि शॉर्ट टर्म अभ्यासक्रमाचे महत्त्व वाढणार आहे.

डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, भारती विद्यापीठाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या या संकटात विम्याचे सुरक्षा कवच दिले. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.