शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

हगणदारीमुक्तीला अडथळा इंदापूरचा

By admin | Updated: February 17, 2017 04:42 IST

गेल्या ७ महिन्यांपासून जिल्ह्यात हगणदरीमुक्ती मोहीम राबविण्यात येत असून, आतापर्यंत १३ तालुक्यांपैैकी ६ तालुके हगणदरीमुक्त

पुणे : गेल्या ७ महिन्यांपासून जिल्ह्यात हगणदरीमुक्ती मोहीम राबविण्यात येत असून, आतापर्यंत १३ तालुक्यांपैैकी ६ तालुके हगणदरीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. नुकताच पुरंदर तालुका हगणदरीमुक्त झाला आहे. इतर तालुक्यांतही कमी प्रमाणात काम शिल्लक आहे; मात्र इंदापूर तालुक्यात अजूनही ७,९१७ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. तालुक्यात २१ गावे अशी आहेत, की तिथे आजही १०० पेक्षा जास्त कुटुंबांकडे शौचालये नाहीत.गेल्या वर्षभरात जिल्हा परिषद प्रशासनाने प्राधान्याने हाती घेतलेली मोहीम म्हणजे जिल्हा हगणदरीमुक्ती. ३१ डिसेंबर ही डेडलाईन जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविली होती. मात्र, तोपर्यंत ४ तालुके १०० टक्के करण्यात प्रशासनाला यश आले होते. शासनाने ३१ मार्च ही डेडलाईन दिली असून, प्रशासनाकडून या तारखेपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर आता हवेली व पुरंदर हे दोन तालुके करण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. आतापर्यंत मुळशी, भोर, वेल्हे, खेड, हवेली, पुरंदर हे तालुके हगणदरीमुक्त झाले असून इंदापूर, बारामती, मावळ, आंबेगाव, जुन्नर, शिरूर व दौैंड हे ७ तालुके अद्याप बाकी आहेत.जिल्ह्यात ६ लाख २८ हजार ३८५ कुटुंबे असून, त्यांपैैकी आतापर्यंत ६ लाख ४ हजार २४२ कुटुंबांकडे शौचालये आहेत. अद्याप १३ हजार ६१० कुटुंबे बाकी असून, त्यात एकट्या इंदापूर तालुक्यातील ७ हजार ९१७ कुटुंबे आहेत. त्यानंतर बारामतीतील १ हजार ७२१, मावळमधील १ हजार ४३४, आंबेगावमधील १ हजार १४६, जुन्नरमधील ६८१, शिरूरमधील ३६१ तर दौैंडमधील फक्त ३३० कुटुंबांकडे शौचालये नाहीत. इंदापूर तालुक्यात ८६.८१ टक्के काम झाले आहे. अद्याप ७ हजार ९१७ कुटुंबांकडे शौैचालये नाहीत. २१ गावे अशी आहेत, की तेथे १०० पेक्षा जास्त कटुंबांकडे शौैचालये नाहीत. यात येथील लोकप्रतिनिधीच्या गावांचाही समावेश आहे. त्यामुळे उर्वरित दीड महिन्यात प्रशासनाला या तालुक्यावर लक्ष केंद्रित करून मोठे काम करणे गरजेचे आहे.