शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Updated: May 28, 2016 04:16 IST

येथील माणिकचौक, शिक्रापूरचौक आणि जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरील; तसेच एसटी बसस्थानकाबाहेरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर अखेर शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात

चाकण : येथील माणिकचौक, शिक्रापूरचौक आणि जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरील; तसेच एसटी बसस्थानकाबाहेरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर अखेर शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.यात अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांचा समावेश असून, राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग, नगरपरिषद यांनी संयुक्त कारवाई केली. त्यामुळे येथील चौकांनी मोकळा श्वास घेतला.गेल्या अनेक दिवसांपासून येथील अतिक्रमणांमुळे मोठी वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे नागरिकांसह प्रवासी मेटाकुटीला आले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण केलेल्या टपरी धारकांना दिनांक ९/०५/२०१६ व १३/०५/२०१६ रोजी पूर्व सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी अतिक्रमणे काढली नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील माणिक चौकतील दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमणांवर हातोडा मारला .आज (दि.२७) सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता एस. पी. हबू, सहायक अभियंता पूजा काळे, चाकण नगर परिषदचे आरोग्य विभागाचे विजय भोंडवे, महसूल विभागाचे मंडल अधिकारी आर. एस. मोराळे, तलाठी एम. एम.चोरमले, बांधकाम विभागाचे पदाधिकारी, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहायक पोलीस निरीक्षक संजय ढवाण, उपनिरीक्षक महेश मुंढे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)अतिक्रमणांची कारवाई करण्यापूर्वी पूर्वसूचना न देता प्रशासनाने अचानक कारवाई केल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यात मोठी नाराजी होती. मात्र, या कारवाईपूर्वी पंधरा दिवसांत दोन वेळा रीतसर नोटीस बजावूनही अतिक्रमणधारकांचे दुर्लक्ष केल्यामुळे आजची कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.