शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अण्णापूरमध्ये ५६ घरांवर हातोडा

By admin | Updated: October 27, 2016 05:04 IST

शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या अण्णापूर (ता. शिरूर) येथील गायरान जमिनीवरील ५६ घरांचे अतिक्रमण प्रशासनाने आज काढले. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील

टाकळी हाजी : शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या अण्णापूर (ता. शिरूर) येथील गायरान जमिनीवरील ५६ घरांचे अतिक्रमण प्रशासनाने आज काढले. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. शिरूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये गायरान जमिनी, तसेच गावठाण हद्दी अतिक्रमणाने वेढलेल्या आहेत. त्यांच्यावर राजकीय पुढाऱ्यांचाच वरदहस्त असल्यामुळे काही ठिकाणी पक्की घरे, व्यापारी गाळे आणि बंगलेही उभे राहिले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही ही अतिक्रमणे वर्षानुवर्षे तशीच आहेत. त्यामुळे गावच्या विकासाच्या नवीन योजना राबविताना जागेसाठी ग्रामपंचायतीसमोरच समस्या उभी राहत आहे. अण्णापूर (ता. शिरूर) येथे गट नं. ३०५२ मध्ये शिरूर-भीमाशंकर रस्त्याच्या शेजारी महत्त्वाच्या जागेवर ५६ लोकांनी घर, गोठा अशा पद्धतीने अतिक्रमण केले होते. ग्रामपंचायतीने या लोकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र काही लोकांनी आयुक्तांकडून स्थगिती मिळविली होती. याबाबत गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ म्हणाले, की सन २०११ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. त्यांच्यानुसार तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, सहायक गटविकास अधिकारी ए. व्ही. बांगर यांच्यासह पोलीस निरीक्षक दयानंद गावडे त्यांच्या पोलीस बंदोबस्तासह हे अतिक्रमण काढण्यात आले. पश्चिम भागातील पिंपरखेड, टाकळीहाजी, वडनेर, जांबुत, मलठणमध्येदेखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. तसेच पूर्व भागातील मांडवगण फराटा, इनामगाव सादलगाव यांसारख्या अनेक गावांत अतिक्रमणे आहेत. बसस्थानक व मोक्याच्या जागांवरील अतिक्रमणे काढल्यास मुलासाठी खेळाची मैदाने, शाळा, दवाखाना यांसारख्या सार्वजनिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध होऊ शकते. (वार्ताहर)