शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वारीच्या मुक्कामांचे ‘हगणदरीमुक्त’ मॉडेल

By admin | Updated: July 19, 2015 03:48 IST

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हगणदरीमुक्त मॉडेलचा उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशनने राबविला आहे. पुणे ते पंढरपूर मार्गावरील यवत

- हणमंत पाटील,  पुणेसंत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हगणदरीमुक्त मॉडेलचा उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशनने राबविला आहे. पुणे ते पंढरपूर मार्गावरील यवत व लोणी येथील मुक्कामाच्या ठिकाणी पोर्टेबल स्वच्छतागृहे उभारून दोन्ही गावे हगणदरीमुक्त करण्यात आली आहेत. पुणे शहरात संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे जंगी स्वागत दर वर्षी केले जाते. शहरातील मुक्कामा वेळी महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा देण्यात येते. मात्र, गावांतील मुक्कामा वेळी उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर, तुकाराममहाराज पालखीमध्ये जनजागृती करून मुक्कामाची गावे हगणदरीमुक्त करण्याचा पथदर्शी प्रयोग राबविण्यासाठी पुण्यातील सेवा सहयोग फाउंडेशनने पुढाकार घेतला. हा पहिला प्रकल्प राबविण्यासाठी यवत व लोणी गावांची निवड केली. त्यानुसार लोकवर्गणीतून दोन्ही गावांत सुमारे ४०० पोर्टेबल स्वच्छतागृहे उभारण्यात आली. शहरातील ‘आयटी’ व खासगी कंपन्यांतील तरुणांनी या उपक्रमांत भाग घेतला. दोन्ही पालख्या यवत व लोणी या ठिकाणी मुक्कामाला येण्यापूर्वीपासून ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व स्थानिक नागरिकांच्या लोकसहभागातून सेवा फाउंडेशनने वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली. त्यामुळे मुक्कामाच्या दिवशी दोन्ही गावे हगणदारीमुक्त ठेवण्याचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला. या अभियानाचे संयोजन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले. रावत म्हणाले, ‘‘यवत व लोणी गावांत सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून पथके नियुक्त केली होती. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शैैलेश घाटपांडे, निनाद संस्थेचे उदय जोशी, शिवाजी मोरे, अतुल लिमये, संदीप जाधव, मारुती तुपे, नंदकिशोर काळभोर, संतोष दाभाडे, बाळासाहेब आमराळे, धनंजय वाडेकर यांनी स्वयंसेवकांच्या पथकांची जबाबदारी पार पाडली. लोकवर्गणी व लोकसहभागातून हा प्रयोग करण्यात आल्याने साधारण एका गावात ४ लाख रुपये खर्च झाला आहे. दोन्ही पालख्यांची सुमारे ४० मुक्कामाची ठिकाणे आहेत. सर्व ठिकाणी हे मॉडेल राबविल्यास साधारण दीड ते दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे.’’ संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे दर वर्षी लोणीचे ग्रामस्थ आनंदाने स्वागत करून अन्नदान करतात. परंतु, स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने परिसरात वारीनंतर दुर्गंधी निर्माण होते. या वर्षी वारीचा मुक्काम हगणदरीमुक्त करण्याचा प्रयोग लोकसहभागामुळे यशस्वी झाला.- नंदकिशोर काळभोर, ग्रामस्थ, लोणी.