शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

हडपसरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड

By admin | Updated: March 6, 2017 20:09 IST

एका सराईत गुंडाने तब्बल दहा ते बारा साथीदारांच्या सोबतीने एका तरुणाला मारहाण करीत रस्त्यावरील चारचाकी आणि दुचाकींची

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 6 - एका सराईत गुंडाने तब्बल दहा ते बारा साथीदारांच्या सोबतीने एका तरुणाला मारहाण करीत रस्त्यावरील चारचाकी आणि दुचाकींची तोडफोड केली. विशेष म्हणजे हा गुंड नुकताच्या खुनाच्या गुन्ह्यात सुटून बाहेर आला आहे. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकारामुळे हडपसर परिसरात एएकच दहशत पसरली आहे. याकूब उर्फ मुस्तफा शेख (वय 52, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रफुल राजा, गोट्या व आणखी एक अशा तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जवळपास दहा ते बारा जण तोडफोड करीत असताना दिसत असतानाही गुन्हा मात्र तिघांवरच दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख आणि आरोपी पुर्वी हडपसरमधील म्हाडा कॉलनीमध्ये राहण्यास होते. शेख यांचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. आरोपींपैकी काहीजण नुकतेच खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आले आहेत. यातील काहीजणांनी दोन दिवसांपुर्वी शेख यांना धमकावत पैशांची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शेख यांच्या घरामध्ये घुसून त्यांना हॉकीस्टीकने मारहाण केली. रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारी, आॅटो रिक्षा, दुचाकींची तोडफोड केली. जवळपास 15 मिनिटे हा प्रकार सुरु होता. या घटनेमुळे रहिवाशांसह लहान मुलांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शेख यांनी रात्री उशिरा पोलिसांकडे धाव घेतली तेव्हा पोललिसांना हा प्रकार समजला. याप्रकाराबाबत पोलीस ठाण्याचे अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. या गुंडांना पोलिसांचेच अभय असल्यामुळे त्यांची हिम्मत वाढल्याचा आरोप रहीवाशांकडून केला जात आहे.