शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गुंड अप्पा लोंढे खून खटल्याची सुनावणी येरवडा कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:13 IST

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे यांच्या खून खटल्याची सुनावणी २० जानेवारीपासून येरवडा कारागृहातील न्यायालयातच सुरू होणार आहे. सत्र ...

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे यांच्या खून खटल्याची सुनावणी २० जानेवारीपासून येरवडा कारागृहातील न्यायालयातच सुरू होणार आहे. सत्र व विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. सिरसीकर यांच्यासमोर येरवडा कारागृहाच्या आवारातील न्यायालयात ही सुनावणी दररोज होणार आहे. विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विकास शहा कामकाज पाहणार आहेत.

या प्रकरणात मोक्कानुसार संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, नितीन महादेव मोगल, विष्णू यशवंत जाधव, नागेश लक्ष्मण झाडकर, मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा, विकास प्रभाकर यादव, गोरख बबन कानकाटे, अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड, प्रवीण मारुती कुंजीर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अप्पा लोंढे याचा भविष्यात जमीन, वाळूच्या व्यवहारात आणि इतर धंद्यांत अडसर होऊ नये म्हणून आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अप्पा लोंढे हा २८ मे २०१५ रोजी सकाळी मॉर्निग वॉकला जात असताना गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला होता.

या खटल्यात आरोपींची संख्या अधिक आहे. तसेच, आरोपींनी आमच्या समोर खटल्याचे कामकाज चालावे. आम्हाला वकिलांशी बोलता येत नाही, असे सांगितले होते. त्यामुळे या सर्व आरोपींना बुधवारी जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. आरोपींना दररोज जिल्हा न्यायालयात हजर करताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच न्यायालयात गर्दी होऊ शकते. त्यामुळे कारागृहात उभारण्यात आलेल्या न्यायालयात या खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील विकास शहा यांनी सांगितले.

लॅाकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटला

जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणाऱ्या जिंदा सुखा यांच्यावरील खटल्याची सुनावणी येरवडा कारागृहात झाली होती. येरवडा कारागृहात मुख्य गेटजवळ कोर्ट तयार करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आरोपींना न्यायालयात आणणे अशक्य असल्याने या न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपींना हजर केले जात होते. यापूर्वी येथील न्यायालयात सुरक्षेच्या कारणावरून काही खटल्यांची सुनावणी घेण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर न्यायालये पूर्णवेळ सुरू झाल्यानंतर कारागृह न्यायालयात खटल्याची नियमित सुनावणी होणारा हा पहिलाच खटला आहे.