शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

गुढीपाडव्याची पुरणपोळी होणार महाग!

By admin | Updated: April 6, 2016 01:39 IST

साखर व गुळाच्या भावाने मागील तीन ते चार वर्षांतील भावाचा उच्चांक गाठला आहे. तपमानाच्या साखरेच्या भावाचा पाराही किरकोळ बाजारात चाळिशीत गेला आहे.

पुणे : साखर व गुळाच्या भावाने मागील तीन ते चार वर्षांतील भावाचा उच्चांक गाठला आहे. तपमानाच्या साखरेच्या भावाचा पाराही किरकोळ बाजारात चाळिशीत गेला आहे. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना उष्णतेच्या लाटेबरोबरच साखर, गुळाच्या भाववाढीच्या झळही सोसाव्या लागत आहेत. राज्यातील नागरिक सध्या उन्हाच्या झळांनी बेजार झाले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. साखर व गुळाच्या भाववाढीचा पाराही मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत चालला आहे. या भाववाढीने नागरिकांच्या खिशावरील बोजा वाढला आहे. या वर्षात जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला साखरेच्या भावाने घाऊक बाजारात तिशी गाठली. त्यानंतर हे भाव सातत्याने वाढू लागले आहेत. मंगळवारी घाऊक बाजारात साखरेचे भाव क्विंटलमागे ३५५० ते ३६०० रुपयांपर्यंत पोहचले. तर किरकोळ बाजारात प्रति किलो ३८ ते ४० रुपयांपर्यंत साखरेची विक्री होत आहे. मागील वर्षी याच कालावधीत साखरेचे घाऊक बाजारातील भाव प्रति क्ंिवटल २५०० रुपयांच्या घरात होते. जानेवारी २०१४ मध्येही हे भाव साधारण तेवढेच होते. यंदा तुलनेने प्रति किलो जवळपास दहा रुपयांनी साखर महागली आहे. तीन ते चार वर्षांपुर्वी साखरेचे भाव ४० रुपयांपर्यंत वाढले होते. त्यानंतर यंदा पुन्हा अशीच भाववाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव प्रति क्विंटल ४६५ डॉलरवरून ४३५ डॉलरपर्यंत खाली आले आहेत. तरीही स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या भावातही वाढ सातत्याने सुरू आहे. अनेक साखर कारखान्यांनी सध्या बाजारात मोजकीच साखर आणण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. तसेच कारखान्यांकडून जादा भावाने साखर विक्री केली जात आहे. त्यामुळे बाजारात वाढीव भावाने साखर खरेदी करावी लागत आहे. > मागील काही वर्षांपासून राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मजुर मिळत नसल्याने गुऱ्हाळे बंद होत आहेत. सध्या कऱ्हाड, कोल्हापूर, पाटण या भागातील गुऱ्हाळे बंद झाली आहेत. केडगाव, पाटण, राहू, पिंपळगाव या भागातून गुळाची आवक होत आहे. गुढीपाडव्यामुळे गुळाची मागणी वाढली आहे. पण गुळाचा तुटवडा जाणवत असल्याने सातत्याने भाववाढ होत असल्याची माहिती गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.> साखरेचे भावगुळ११ जानेवारी २०१४ २७५०-२८०० २२७५-२७२५ १२ जुलै २०१४३०५०-३१००२८००-३२००१३ डिसेंबर २०१४२६५०-२६७५२१२५-२६००१० जानेवारी २०१५२६२५-२६५०२२२५-२७००११ जुलै २०१५२१००-२१५०२१५०-२५५०१२ डिसेंबर २०१५२७००-२७५०२२००-२६००२ जानेवारी २०१६३०७५-३१००२३२५-२७००१३ फेब्रुवारी २०१६३१७५-३२००२४५०-२७००५ मार्च २०१६३२००-३२२५२४००-२७२५५ एप्रिल २०१६३५५०-३६००३१००-३५२५