शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: February 4, 2017 03:54 IST

समन्वय व परस्पर सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याने निवडणूकीचे कामकाज पहाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या

इंदापूर : समन्वय व परस्पर सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याने निवडणूकीचे कामकाज पहाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांबद्दल असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी या सर्वांनी कामकाज बंद करुन त्यांना घेराव घातला होता. या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रारी अर्जही पाठवण्यात आला आहे. आम्ही निवडणूकीसंदभार्तील सर्व कामे कसला ही हलगर्जीपणा न करता प्रामाणिकपणे करत आहोत. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देत आहेत. आम्ही गुलाम असल्याप्रमाणे हीन व तुच्छतेची भाषा वापरत आहेत. हे प्रकार वारंवार होतं असल्याने आमचे मनोधैर्य व काम करण्याची मानसिकता पूर्णपणे ढासळली आहे, असे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या हाताखाली काम करण्याची आमची मानसिकता नाही.तरी निवेदनाची दखल घेवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. निवेदनाखाली गटविकास अधिकारी माणीकराव बिचकुले, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. लहू वडापूरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, क्षेत्रीय कृषी अधिकारी प्रवीण जाधव, भूमी अभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक नरेंद्र झांबरे यांच्यासह ४३ जणांच्या सह्या आहेत. या संदर्भात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम म्हणाले, की निवडणूकीचे कामकाज पहाण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वत:ची गैरसमजूत करून घेतली आहे. निवडणूक कामकाजासंदर्भात वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या बैठकांना यातील बरेच जण येत नाहीत.आले तर वेळेवर येत नाहीत. निवडणूका सारख्या येत नाहीत.त्यामुळे त्यांच्या कामास प्राधान्य दिले गेले पाहीजे. मात्र तसे केले जात नाही. या सर्वांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला असता, वरील कुभांड रचण्यात आले आहे.(वार्ताहर)