स्वराज्य प्राप्तीसाठी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत राहणाऱ्या महादेव कोळी समाजाने अनेक उठाव केले. मोघलांविरुद्ध अनेक वेळा निकराची झुंज दिली. वीर खेमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभा केला. महादेव कोळ्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेऊन शहाजहान बादशहाने मोठी कुमक पाठवून स्वराज्यासाठी चाललेल्या बंडाळीचा बंदोबस्त केला. हजारो महादेव कोळ्यांची धरपकड करून त्यांना दहशत बसविण्यासाठी जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर जवळजवळ सोळाशेच्या वर महादेव कोळी शूरवीरांचे शिरकाण करण्यात आले. सामूदायिक कत्तलीच्या या चौथ-याची नोंद इतिहासात काळा चौथरा म्हणून झाली आहे. पण त्याचे सार्थ नाव ‘महादेव कोळी चौथरा’ असे आहे. याचा उल्लेख इंग्रजांच्या मुंबई, ठाणे, पुणे या गॅझेटमध्ये सापडला आहे आणि म्हणून समस्त आदिवासी बांधव जुन्नर तालुका यांच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या सोळाशे वीर महादेव कोळी वीरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि जुन्नर तालुक्यातून अनेक समाज बांधवांनी जुन्नर येथे शिवनेरीच्या पायथ्याशी येऊन स्मृतिफलकाजवळ अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते. त्याचबरोबर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरद माळी, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, आंबेगाव पंचायत समिती सभापती संजय गवारी, नाशिक जि. प. सदस्य हरिदास लोहकरे, अशोक टोंगारे, पीडीसीसी बँक संचालक तुळशीरामजी भोईर, सुभाष मोरमारे, विजय आढारी, मधुकर काठे, भाऊसाहेब देवाडे, विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. याप्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी शिवनेरी पर्यटन विकास अंतर्गत महादेव कोळी चौथरा विकास व सुशोभीकरणास प्रथम प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. सूत्रसंचालन मोहन लांडे, प्रस्ताविक दत्तात्रय गवारी यांनी केले.
050921\img_20210905_145156.jpg
माननीय झिरवाळ साहेबांनी विधानसभेत महादेव कोळी चौथरा कार्यक्रम शासकीय पातळीवर साजरा होण्याच्या दृष्टीने निश्चित प्रयत्न केले जातील अशी भूमिका स्पष्ट केली. आणि सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम करावा असे आवाहन समाज बांधवांना केले.