शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

माळीणला तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: June 3, 2016 00:39 IST

माळीण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहणारे लोक बुब्रा नदीत पुलाखाली केलेल्या डवऱ्यातून पिण्यासाठी पाणी काढत आहेत.

घोडेगाव : माळीण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहणारे लोक बुब्रा नदीत पुलाखाली केलेल्या डवऱ्यातून पिण्यासाठी पाणी काढत आहेत. माळीण गाव गाडले गेल्यानंतर वाचलेल्या ग्रामस्थांसाठी माळीण फाट्यावर तात्पुरती निवारा शेड बांधून देण्यात आली आहे. या शेडवर पाण्यासाठी पाणी योजना, बोअरदेखील करण्यात आली. मात्र, कोणत्याही स्रोताला पाणी राहिले नसल्याने सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माळीण ग्रामस्थांनी बुब्रा नदीत डवरा केला असून, यातून पिण्यासाठी पाणी नेत आहेत. या डवऱ्याला कमी पाणी येत असल्याने एक तासात दोन हंडे पाणी भरते. हे पाणीदेखील वाटीने भरण्याची वेळ माळीण ग्रामस्थांवर आली आहे. तसेच पुनर्वसन होत असलेल्या माळीणसाठी देखील लाखो रुपयांची पाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. परंतु योजनेच्या विहिरीला व बोअरला पाणी लागले नसल्याने पाण्यासाठी वेगळ्या पर्यायांची शोधाशोध सुरू झाली आहे. बुब्रा नदीत मोठा बंधारा करून याद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो किंवा आसाणे गावाच्यावर पाईलडोहचे काम पूर्ण करून पाणी आणण्याचे नियोजन सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात सध्या ३ टँकरद्वारे सहा गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. यातील दोन टँकर सरकारी व एक टँकर खासगी आहे. तर उर्वरित टंचाईग्रस्त गावांसाठी जिल्हाधिकारी यांनी ४ टँकर मंजूर केले आहेत.यामध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील गावांचा समावेश आहे. हे टॅँंकर पुरवठा करण्याचे काम सोनाई दूध वाहतूक संस्थेला असून, तसे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्याकडून टॅँकर मिळत नसल्याने टंचाईग्रस्त गावांचे सध्या हाल सुरू आहेत. डवऱ्याला कमी पाणी येत असल्याने एक तासात दोन हंडे पाणी भरते. हे पाणीदेखील वाटीने भरण्याची वेळ माळीण ग्रामस्थांवर आली आहे. कायमस्वरूपी पुनर्वसन होत असलेल्या माळीण गावासाठी देखील लाखो रुपयांची पाणी योजना करण्याचे काम सुरू आहे.> घोडेगाव शहरात टंचाईघोडेगाव : घोडेगाव शहराला अनेक वर्षांनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. घोड नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरीला पाणी कमी पडले असून, पाणीपुरवठ्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे सध्या दिवसाआड पाणी येत असून, लवकर पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.‘पाण्याबाबत घोडेगाव सुखी’ असल्याचे सर्वजण म्हणतात; मात्र या वर्षी प्रथमच घोडेगावला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. डिंभे धरणात शून्य टक्के पाणीसाठा झाल्याने धरणातून नदी, कालवे यांना पाणी बंद झाले आहे. त्यामुळे नदीला पाणी येण्याचा स्रोत बंद झाल्याने नदीपात्र कोरडे पडू लागले आहे. नदीतून विहिरीत येणारे पाणी कमी झाल्याने पाणीपुरवठ्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे घोडेगाव शहराला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. लवकर पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. हीच परिस्थिती घोडेगावजवळील धोंडमाळ, शिंदेवाडी, काळेवाडी, गोनवडी गावांची झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. घोडेगाव व परिसरात प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे जनावरे आहेत.