शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महा ई-सेवा केंद्र करतेय लूट

By admin | Updated: July 27, 2015 03:59 IST

विविध शासकीय कामांसाठी प्रशासनाने आधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे विद्यार्थी, पालक व नागरिक त्यासाठी धावपळ करीत आहेत. मात्र, कोणत्याच

आळंदी : विविध शासकीय कामांसाठी प्रशासनाने आधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे विद्यार्थी, पालक व नागरिक त्यासाठी धावपळ करीत आहेत. मात्र, कोणत्याच शाळेत आधार यंत्रणा उपलब्ध नाही. उपलब्ध महा-ई-सेवा केंद्रावर विद्यार्थी, पालक व नागरिकांची गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेऊन महा-ई-सेवा केंद्राकडून कमीत कमी १०० ते ५०० रुपये उकळले जात आहेत. आळंदी येथे नगरपालिकेच्या एकूण चार शाळा, श्रीमती लक्ष्मीबाई दुराफे व ज्ञानेश्वर विद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ९००० च्या आसपास आहे. या विद्यार्थ्यांना आधार कार्डचा नंबर शालेय प्रशासनाने मागितला असल्यामुळे विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही ‘आधार’साठी कामधंदा बुडवून खटाटोप करावी लागत आहे. नागरिकांनाही विविध शासकीय कामासाठी आधार कार्ड आवश्यक असल्यामुळे त्यांचीही गर्दी होत आहे. शहरात उपलब्ध असलेल्या महा-ई-सेवा केंद्राकडे त्यामुळे गर्दी वाढली असून, विद्यार्थी, पालक व नागरिकांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे या ‘आधार’ गोंधळात दिवसभराच्या कामाचा खोळंबा होत असल्याने पालक व नागरिक त्रस्त असून, विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्येच ही तात्पुरती आधार यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात येत आहे.याच होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत महा-ई-सेवा केंद्राने कमाईचा मार्ग शोधला असून, ‘आधार कार्ड’ नोंदणीसाठी कमीत कमी १०० व जास्तीत जास्त ५०० रुपये घेण्याचा प्रकार सुरू केला असल्याचे नागरिकांनी सांगितले. शाळेत वेळीच आधार यंत्रणा उपलब्ध करण्यात आली नाही व महा-ई-सेवा केंद्राकडून पैसे उकळणे बंद नाही झाल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा पालक व नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)