बारामती : बारामती शहर आणि परिसरामध्ये शनिवारी (दि. 13) अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिसरातील डोर्लेवाडी, मळद, मेडद, गुणवडी, काटेवीडी भागामध्ये पावसाचा जोर होता. या बागायती पट्टय़ातील काढणीला आलेल्या बाजरीच्या पिकांना या पावसाचा फटका बसलेला आहे. सायंकाळी 5.3क् ते 6 च्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली.
मागील दोन दिवसांपासून बारामती तालुक्यात ढगाळ हवामान आहे. अचानक बदलेल्या वातावरणामुळे बागायती पट्टय़ातील फळबागा रोगांना बळी पडतच आहेत. केळीच्या बागांवर करप्याचा प्रादर्भाव वाढला आहे, तर द्राक्ष आणि डाळिंब बागांना फळगळतीने ग्रासले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतक:यांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या ऊस कारखान्याचा हंगाम जोरात सुरू आहे. ऊस पट्टय़ात झालेल्या पावसामुळे ऊसतोडी मंदावणार आहेत. तर काही भागात रस्ते चिखलमय झाल्याने ऊसतोडी दोन ते तीन दिवस थांबणार आहेत. तसेच चारापिकांचेही मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या जिरायतीभागात चारा टंचाईमुळे शेतक:यांना बागायतीभागातून जादा दराने चारा खरेदी करावा लागत होता. मात्र बागायतीभागाला अवकाळी पावसाने झोडपल्याने चारा पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात चा:याच्या दरात आनखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
(प्रतिनिधी)
कही खुशी कही गम..
4दौंड : दौंड तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हतबल झाला असून नुकसान झालेल्या पिकांचा शासनाने पंचनामा करुन शेतक:यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन हवेत गारवा सुटला होता त्यातच शुक्रवारी सायंकाळी पावसाने झोडपले.
अवकाळी पावसामुळे ऊस सोडून इतर पिकांवर करपा रोग पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतक:यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. तसेच भाजीपाला आणि इतर पिकांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
-प्रदीप घाडगे, दौंड तालुका कृषी अधिकारी
बटाटय़ाचेही नुकसान
4दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वा:यांसह जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा, बटाटा, ज्वारी व तरकारी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या कोथिंबीर, मेथी पावसाने झोडपल्यामुळे भुईसपाट झाल्याने शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
4तालुक्याच्या पूर्व भागातील होलेवाडी, मांजरेवाडी, रेटवडी, खरपुडी, वाटेकरवाडी, दावडी, निमगाव, चिंचोशी, दौडकरवाडी, आमराळवाडी या परिसरात शुक्रवारी रात्री जोरदार वादळी वा:यांसह अवकाळी पाऊस कोसळला. या पावसाने शेतातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. ज्वारी, मका ही पिके शेतातच आडवी झाली.
4कोथिंबीर, मेथी ही पिके भुईसपाट झाली असून, शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्टी, कारखानदाराचे या पावसाने मोठे नुकसान झाले. मातीच्या तयार केलेल्या कच्च विटा भिजल्या असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
4अवकाळी पावसाने कांदा व बटाटा या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतक:यांमध्ये आहे.
4शुकवारी रात्री दौंड तालुक्यातील काही भागात पाऊस झाला दरम्यान शनिवारी दुपारी दौंड शहरात वीजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी झाल्या मात्र पाटस, केडगाव, वरवंड, देऊळगावराजे या गावात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून काही भागातील शेतात उभी पिके जमीनदोस्त झालेली आहेत. तर काही काढणीला आलेल्या पिकांची देखील नुकसान झाले आहे.
4अवकाळीचा ज्वारीपिकाला फायदा झाला असला, तरी ढगाळ हवामानामुळे पिकांवर चिकटय़ा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिकांवर परिणाम होणार आहे. भोर तालुक्यात दुर्गम डोंगरी भागात भाताचा पेंढा व गवत काढून उन्हासाठी जनावरांना चारा म्हणून साठवून ठेवतात; मात्र पावसाने पेंढा व गवत भिजल्याने या वेळी चा:याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतक:यांची ‘थोडी खुशी-थोडा गम’ अशी आवस्था झाली आहे.
4गेल्या वर्षी झालेल्या गारपीटमध्ये झालेल्या नुकसान भरपाईही अद्याप काही शेतक:यांना मिळालेली नाही. यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची स्थिती आहे. त्यातच अचानक हिवाळय़ातच अवकाळीने फटका दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.