शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

लोणेरे विद्यापीठाकडे शासनाचे दुर्लक्षच

By admin | Updated: November 2, 2015 01:07 IST

तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले

पुणे : तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले. परंतु, स्थापनेपासून शासनाचे विद्यापीठाकडे दुर्लक्ष झाले. तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाकडे केवळ एक लहान महाविद्यालय म्हणूनच पाहिले. परिणामी विद्यापीठात पायाभूत व शैक्षणिक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने विद्यापीठाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.विद्यापीठाची स्थापना १९८९ मध्ये करण्यात आली. मात्र, त्यानंतर शासनाने या विद्यापीठाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली नाहीत. विद्यापीठात कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी या प्रमुख पदांसह शासनाने मंजूर केलेल्या पदांपैकी तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत. विद्यापीठासाठी सुमारे ५०० एकर जागा राखून ठेवण्यात आली आहे. मात्र, परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय, अत्याधुनिक रुणालये आदींचा विचार झालेला नाही. परिणामी या क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक येथे येत नाहीत. परंतु, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच येथील १० विद्यार्थ्यांना शुक्रवारी पॉस्को कंपनीतर्फे तब्बल ५०० डॉलरची पाठ्यवृत्ती देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाचे अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या सर्व महाविद्यालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी जोडण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. मात्र, विद्यापीठाची एकूण स्थिती विचारात घेता सर्व महाविद्यालयांना विद्यापीठाशी संलग्न केल्यास राज्यातील तंत्रशिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय स्थगित ठेवला आहे. तंत्रशिक्षण विभागाकडे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती व पदोन्नतीचे प्रश्न प्रलंबित असून, अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होत नाही. येथील स्थानिक विद्यापीठाचा उल्लेख लोणेरे कॉलेज असाच करतात. एकूण अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी सर्वाधिक महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. या महाविद्यालयांना लोणेरे विद्यापीठाशी संलग्न करण्यास संस्थाचालकांचा विरोध आहे. मात्र, तंत्रशिक्षणात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व महाविद्यालये जोडण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार सुरू केला आहे.