शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार निष्क्रिय

By admin | Updated: May 20, 2016 02:19 IST

राज्यातील जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे

शिरूर : राज्यातील जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सगळीकडे भीषण दुष्काळ पडला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. भाजपा-शिवसेना सरकारला उच्च न्यायालय यांना सांगावे लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, हे सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप शिरूरचे माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी केला.शिरूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले नाही, तर शिरूर तहसीलदार कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा इशारा या वेळी त्यांनी दिला.या वेळी सरकारचा निषेध म्हणून रस्त्यांवर कांदा व दूध टाकून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी केले.या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर बाजार समिती चेअरमन देवदत्त निकम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समिती सभापती सिद्धार्थ कदम, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविबापू काळे, युवकचे तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, शहराध्यक्ष जाकीर खान पठाण, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, बाळासाहेब नरके, घोडगंगा कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब फराटे, शेखर पाचुंदकर, शिक्षण मंडळ माजी सभापती नीलेश खाबीया, खरेदी-विक्री चेअरमन बाळासाहेब नागवडे, उपसभापती मंगलाताई लंघे, राजेंद्र गावडे, सोमनाथ भुजबळ, दत्ता हरगुडे, शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष वर्षाताई शिवले, संतोष रणदिवे, बाबासाहेब भोर, शैलेश घाडगे, सुधीर फराटे, जयवंत सालुंके, विकास लवांडे, दिलीप मोकाशी, सुधीर फराटे, जगन्नाथ पाचर्णे, पोपट दसगुडे, सुभाष कळसकर, विक्रम वर्पे, विलास कर्डिले उपस्थितीत होते. शिरूर-न्हावरे फाटा येथे पुणे-नगर रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. या वेळी भाजपा-शिवसेना सरकारचा निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. वोडाफोनला दोन हजार कोटींची सूट देणारे सरकार शेतकऱ्यांच्या कांदा, दूधदराच्या बाबतीत मूग गिळून गप्प का? असा सवाल करून, शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतु या सरकारला त्याचे देणे-घेणे नाही, असे मत अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.काळेधन आणणारे सरकार प्रत्येक नागरिकांच्या खात्यात पैसे टाकणारे व अच्छे दिन आणणारे सरकार गेले कुठे, कांद्याला बाजारभाव नाही, दुधाला बाजारभाव नाही, कर्जमाफी करणारे सरकार कुठे गेले, वीजमाफी सोडा, परंतु वीजबिलात अकरा टक्के वाढ केली आहे, ही दरवाढ शेतकरी यांनी भरू नये, कोणी अधिकारी बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शण तोडत असतील, तर युवक कॉँग्रेस त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासेल.- मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस