शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सरकार वर्षाचे झाले तरी ‘सेन्सॉर बोर्डा’कडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:20 IST

पुणे : नाट्यगृहे सुरू झाल्यामुळे नवीन नाटके रंगभूमीवर आणण्यासाठी कलाकारांच्या तालमी सुरू झाल्या आहेत. मायबाप रसिकांच्या सेवेसाठी रंगभूमी सज्ज ...

पुणे : नाट्यगृहे सुरू झाल्यामुळे नवीन नाटके रंगभूमीवर आणण्यासाठी कलाकारांच्या तालमी सुरू झाल्या आहेत. मायबाप रसिकांच्या सेवेसाठी रंगभूमी सज्ज झाली आहे. मात्र, महाआघाडी सरकार अस्तित्वात येऊन वर्ष उलटले तरी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) पुनर्रचना करण्यास अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही.

नवीन नाटक लिहिल्यानंतर त्याची संहिता मंडळाकडे पाठविली जाते. त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे तपासल्यानंतर, नाटक रंगभूमीवर सादर करण्याच्या योग्यतेचे असल्याचे प्रमाणपत्र मंडळाकडून मिळाल्यावरच तशी परवानगी मिळते. या मंडळाची पुनर्रचनाच न झाल्याने नवीन नाट्यसंहिता ‘सेन्सॉर’च्या प्रतीक्षेत अडकली आहे.

नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर तत्कालीन सरकारच्या कार्यकाळातील समित्या, मंडळे बरखास्त केली जातात आणि त्यांची पुनर्रचना केली जाते. मात्र, वर्ष उलटून तरी भाषा, साहित्य आणि नाट्यविषयक संस्था, मंडळे, समित्यांची पुनर्रचना करण्यास सरकारला सवड मिळाली नाही. कोरोना लॉकडाऊन काळात नाट्यगृहे बंद होती. त्यामुळे नवीन नाटके रंगमंचावर येण्याची सुतराम शक्यता नव्हती.

लॉकडाऊन काळात अनेक नाटके लिहून तयार आहेत. निर्मात्यांशी त्यांची बोलणी सुरू आहेत. नाटकाला ‘सेन्सॉर बोर्डा’चे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत नाटक रंगभूमीवर आणता येणे शक्य नसल्याने निर्माते कात्रीत सापडले आहेत. जानेवारीपासून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचा काळ सुरू होतो. राज्य नाट्य स्पर्धांसाठी नवीन नाटके लिहिली जातात. सहभागी संस्थांनाही संहिता ‘सेन्सॉर’ करणे बंधनकारक असते.

-------------------

नाटके थांबली

“माझ्या कारकीर्दीत ज्या काही नाट्यसंहिता आल्या त्या सेन्सॉर करण्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यातील नाट्यसंहिता प्रलंबित असण्याची शक्यता आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना लवकरात लवकर व्हायला हवी.”

-अरुण नलावडे, माजी अध्यक्ष रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ

----------------------------

३००-४०० संहिता पडून

“रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना न झाल्यामुळे प्रायोगिक, व्यावसायिक, बालनाट्य, स्पर्धात्मक एकांकिका अशा जवळपास ३०० ते ४०० संहिता पडून आहेत.”

-सुनील महाजन, अध्यक्ष, कोथरूड नाट्य परिषद

----------------