शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

गुंड रोशन लोखंडे, साथीदारांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:11 IST

नऱ्हे गावात कोयता, पिस्तूल नाचवत केली होती दहशत; संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर धायरी : संघटित टोळी ...

नऱ्हे गावात कोयता, पिस्तूल नाचवत केली होती दहशत; संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर

धायरी : संघटित टोळी तयार करून त्यांच्यामार्फत गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करणाऱ्या गुंड रोशन लोखंडे व त्याच्या टोळीतील चार जणांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. रोशन दयानंद लोखंडे (वय २१, रा. नवदीप सोसायटी, मानाजीनगर, नऱ्हे, पुणे) प्रसाद अर्जुन धावडे (वय २०, रा. विठ्ठल रुक्मिणी हाईट्स, जाधवनगर, नांदेडगाव, पुणे), वैभव अरुण तिडके (वय २१, रा. कृष्ण सदन बिल्डिंग, मानाजीनगर, नऱ्हे, पुणे) पवन सुग्रीव बिराजदार (वय २४, रा. दत्तकला अपार्टमेंट, नऱ्हे, पुणे), फैजल फिरोज काझी (वय २१, ऋतुंबरा हाईट्स, राममंदिराजवळ, पिराजीनगर, नऱ्हे, पुणे) अशी पाच आरोपींची नावे आहेत.

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजीनगर परिसरात शिवजयंती दिवशी तडीपार गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांनी हातात कोयता व पिस्तूल घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत आरोपींना तत्काळ अटक केली. नागरिकांत दहशत माजविल्याप्रकरणी तसेच नऱ्हे येथील भूमकर पुलाखाली एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. त्याचबरोबर १५ फेब्रुवारी रोजी एका बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये जाऊन लोखंडी कोयते, चाकू, हॉकी स्टिक अशी हत्यारे बरोबर घेऊन त्याचा धाक दाखवून खंडणी मागत १० हजार रुपये घेतले. यामध्ये सामील असणाऱ्या आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत २१ टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. अनेक टोळ्यांवर प्रभावीपणे ‘मोक्का’ लावल्यामुळे पुण्यातील संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे.

-----------

दोनवेळा तडीपार अन् गुन्ह्यांची मालिका..

गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारावर २०१६ सालापासून पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. रोशन लोखंडे व त्याच्या टोळीविरुद्ध शस्त्र जवळ बाळगणे, शरीराविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे, बेकायदा शस्त्र बाळगणे, अग्निशस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याआधी रोशन लोखंडे याला दोनवेळा तडीपार करण्यात आले होते. मात्र तरीही गुन्ह्यांची मालिका सुरूच होती.

----------------

- गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसेच संघटित टोळी तयार करून त्याचबरोबर गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे.

- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे