शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

सोन्याच्या मोहापायी २ लाखांना लुबाडले

By admin | Updated: May 5, 2015 03:02 IST

सोनवडी (ता. दौंड) परिसरात कमी किमतीत सोने देतो, म्हणून मुंबई येथील गौरव ताटी या व्यक्तीला मारहाण करुन रोख रक्कम व सोन्याच्या वस्तुंसह १ लाख ८८ हजार

दौंड : सोनवडी (ता. दौंड) परिसरात कमी किमतीत सोने देतो, म्हणून मुंबई येथील गौरव ताटी या व्यक्तीला मारहाण करुन रोख रक्कम व सोन्याच्या वस्तुंसह १ लाख ८८ हजार रुपयांना लुबाडण्यात आले़ या प्रकरणी इस्टप शिंदे (वय २५), निभरी भोसले (वय ३५, दोघेही रा. बोरावके नगर, दौंड), बाबा भोसले (वय २५), करिना भोसले (वय २0, दोघेही रा. गोपाळवाडी, दौंड) या चौघांना मुंबई येथे अटक करण्यात आली आहे. आरोपींनी ज्या प्रकारे ताटींना फसविले, तशाच प्रकारे त्यांना सापळ्यात अडकवून पकडण्यात आले़याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुलकर्णी यांनी दिली. गौरव ताटी हे पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन घेऊन रेल्वेने मुंबईला येत असतांना इस्टप शिंदे आणि गौरव ताटी यांची प्रवासात ओळख झाली. यावेळी इस्टप गौरवला म्हणाला की माझ्या आजीचे १0 तोळे सोने आहे. तेव्हा १0 हजार रुपये तोळा या प्रमाणे सोने विकायचे आहे. तर तुम्ही सोने घ्याल का असे सांगुन दोघांनीही एकमेकाचे मोबाईल नंबर घेतले़ दोघांनीही संपर्क साधल्याने १७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गौरव ताटी यांना आरोपींनी दौंड रेल्वे स्थानकातून सोनवडी परिसरात अज्ञात ठिकाणी आणले. तेव्हा या ठिकाणी अन्य चौघांनी गौरव यांना म्हणाले पैसे द्या आम्ही तुम्हाला सोने देतो असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. घाबरुन गौरव हे कोणाला काही न सांगता थेट मुंबईला गेले़ (वार्ताहर)