शेटफळगढे : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात पावसाने ओढ दिल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम भागातील निरगुडे, म्हसोबाची वाडी, शेटफळगढे, लामजेवाडी, काझड, शिंदेवाडी, लाकडी गावातील उसाची उभी पिके जळू लागली आहेत.
ऐन उन्हाळ्यात शेतक:यांनी पाणी काटकसरीने वापरून पिके वाचवली. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतक:यांनी लाखो रुपयांचा खर्च करून हातातोंडशी आलेला घास वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या भागात पावसाचे प्रमाण कमी असते. परंतु, धरण भागात पाऊस पडला तरी किमान कालव्यातून या भागाला पाणी मिळत असते. त्यामुळे शेतकरी नवीन पिकांचे नियोजन करीत असतो. मात्र, चालू वर्षी धरण भागातही पाऊस नाही. तसेच, या परिसरातही पावसाने अद्याप हुलकावनी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्याअभावी शेतात चारा पिके घेण्यात आली नसल्याने जनावरांच्या चा:याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करण्याचे आव्हान आहे. पाणी व चाराटंचाई असल्याने दूधउत्पादनही घटले आहे. तसेच, चारा उपलब्ध करण्यासाठी जादा पैसे खर्च करावे लागत आहेत. दुसरीकडे मात्र दूध दर कमी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)
4जून संपला. जुलै महिना सुरू होऊनही पाऊस सुरू झाला नाही. या वर्षातील खरीप हंगामाची पेरणीची वेळ जवळपास संपली, तरीदेखील पाऊस पडलेला नाही. यामुळेच जनावरांबरोबरच पशू-पक्षी यांचा पाण्याचा आणि चा:याचा प्रश्न गंभीर होत आहे.
4पंधरा जुलैर्पयत पाऊस पडला नाही, तर मात्र दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. असे चित्र दिसत आहे. गेली चार वर्षे दुष्काळाने होरपळत असलेल्या भागाला यावर्षीही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
4बारामती तालुक्याच्या जिरायती भागात अद्याप पाऊसच पडला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चा:याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. ऐन पावसाळ्यात नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी चारा डेपोची मागणी केली आहे.