शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांना किमान वेतन देणार

By admin | Updated: May 7, 2017 01:47 IST

कंत्राटी पद्धतीच्या सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचे व उद्यापासून पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : कंत्राटी पद्धतीच्या सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचे व उद्यापासून पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणाला बसलेल्या कंत्राटी कामगारांनी अखेर उपोषण सोडले.पुणे जिल्हा मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी पद्धतीच्या ४५ कामगारांनी जेजुरी नगरपालिकेच्या गेटसमोर उपोषण आंदोलन सुरू केले होते. गेले चार दिवस आंदोलन सुरू होते. पूर्वीच्या कंत्राटी पद्धतीच्या कामावरील सर्वच कामगारांना कामावर घ्यावे व किमान वेतन मिळावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, शनिवारी दुपारी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, मुख्याधिकारी समीर भुमकर, गटनेते सचिन सोनवणे, बाळासाहेब भुजबळ, गणेश पिंगुवाले, अमृता काटे, श्रीकांत देव, अथर्व एंटरप्रायझेसचे योगेश जगताप, सुनील धिवार, भारतीय जनता पक्षाचे सचिन लंबाते, सचिन पेशवे आदी उपस्थित होते. जेजुरी पालिकेचा आरोग्य व स्वच्छतेचा गतवर्षीचा ठेका हा सुमारे एक कोटी २७ लाख रुपयांचा होता. त्यामध्ये सुमारे ८६ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत होते. यंदाचा ठेका हा सुमारे ९९ लाख रुपयांना अथर्व एंटरप्रायझेस या संस्थेने घेतला आहे. ठेकेदार नवीन असल्याने व ठेका कमी रकमेचा असल्याने पूर्वीचे कामगार व ठेकदार यांच्यामध्ये गेला दीड महिना वाद सुरू होता. दरम्यान, सर्व कामगारांना काम मिळावे व किमान वेतन मिळावे, यासाठी कामगारांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते.या बैठकीत ओला व सुका घनकचरा वेगवेगळा करण्यासाठी नवीन ठेका काढून त्यामध्ये काही कामगारांना सामावून घेणे, स्मशानभूमी, दफनभूमी व बगिचा स्वच्छता यासाठी काही कामगार नेमणे यामध्ये उर्वरित सर्व कामगारांना सामावून घेऊन त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी उपोषण सोडले. नगराध्यक्षा वीणा सोनवणे व मुख्याधिकारी यांच्या हस्ते लिंबूसरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. कामगारांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता, सर्वांनी सहकार्य केल्याने मार्ग निघाल्याचे बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले.कामगारांच्या समवेत १० ते १२ वेळा बैठका झाल्या होत्या, त्या वेळी सर्व कामगार व ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न होता. कोणावरही अन्याय होऊ नये, अशीच आमची भूमिका असून पालिका सर्वांना सहकार्य करेल, अशी ग्वाही गटनेते सचिन सोनवणे यांनी दिली. ठेका कमी रकमेचा असल्याने सर्व कामगारांना न्याय देणे अवघड होते. दुसऱ्या ठेक्यामध्ये त्यांना सामावून घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्याधिकारी समीर भुमकर यांनी सांगितले.