पुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार गेल्या दहा महिन्यापासून सुरु होता. दत्तवाडी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयाने त्याला २७ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा ४५ वर्षांचा आहे. त्याचे त्याच्या पत्नीशी काही कारणावरुन पटत नाही. काही दिवस वेगळे राहून त्यांनी पुन्हा एकत्र राहण्यास सुरुवात केली आहे. खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आरोपी काही दिवसांनी घरी बसला. काम धंदा तो करीत नव्हता.(प्रतिनिधी)
मुलीवर वडिलांकडून बलात्कार
By admin | Updated: June 23, 2014 01:21 IST