शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

करवाढीची टांगती तलवार

By admin | Updated: December 16, 2014 04:15 IST

महापालिकेच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात पुणेकरांवर करवाढीचा भार टाकण्यात येणार आहे.

पुणे : महापालिकेच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात पुणेकरांवर करवाढीचा भार टाकण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने २०१५-१६ या वर्षासाठी पाणीपट्टी, मिळकत करासह विविध करात मिळून सुमारे २२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची चर्चा आहे. त्यामुळे चालू वर्षात एलबीटीपासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच, बांधकाम क्षेत्रातील आर्थिक मंदीमुळे पालिकेचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शिवाय भोगवटा पत्र नसलेल्या मिळकतींचा तिप्पट कर रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात तब्बल ५०० कोटींहून अधिक तूट येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात मिळकतकरामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर २०१५-१६ या वर्षासाठी विविध करांमध्ये साधारण १८ टक्के वाढीचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. निवासी मिळकतीच्या पाणीपट्टीमध्ये जी दरवाढ सुचविण्यात आली आहे त्यामधून सरासरी पाणीपट्टीमध्ये ९०० रुपये इतकी वार्षिक वाढ येत आहे. त्यामुळे ७५ कोटींचे उत्पन्न वाढणार असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. प्रशासनाच्या करवाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीनंतर मुख्यसभेत मान्यता घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)