शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या मानगुटीवर कचऱ्याचे ‘भूत’

By admin | Updated: September 13, 2014 05:23 IST

शहराचे सार्वजनिक आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिका-यांच्या डोक्यावर कच-याचीही जबाबदारी

पुणे : शहराचे सार्वजनिक आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिका-यांच्या डोक्यावर कच-याचीही जबाबदारी असल्याने आरोग्य सोडून केवळ कचरा निर्मूलनाचे काम हे अधिकारी करीत आहेत. विशेष म्हणजे २00४ मध्ये शहरात या वर्षी प्रमाणेच डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला असताना, १२ क्षेत्रीय कार्यालयांत ती रोखण्यासाठीच या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. या वेळी सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी सांभाळून या डॉक्टरांकडे घनकचरा निमूर्लन तसेच व्यवस्थापनाचे काम देण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत ही बाब याउलट झाली असून, आरोग्याला दुय्यम स्थान देऊन, कचरा उचलण्याच्या नियोजनपासून निर्मूलनाच्या कामातच या कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. त्यामुळे डेंग्यूची साथ रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे. शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल २ हजारांहून अधिक रुग्ण शहरात आढळून आले असून, हजारो ठिकाणी साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होत आहे. ही पैदास रोखणे तसेच ही ठिकाणे शोधून ती नष्ट करण्याची जबाबदारी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहे. असे शहरात सुमारे १५ क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत. मात्र, त्यातील एकाही अधिकाऱ्याकडून ही जबाबदारी पार पाडली जात नसल्याचे चित्र आहे. याबाबत माहिती घेतली असता, डॉक्टरांची पदवी घेतलेले हे वैद्यकीय अधिकारी घनकचरा व्यवस्थापनाच्या एक, दोन नव्हे तर तब्बल २२ जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे दिसून आले. कचऱ्याचे काम हे दैनंदिन असल्याने तसेच दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर होत असल्याने या कामातून वेळ मिळाला तरच आरोग्य विभागाचे काम सांभाळणे शक्य होत असल्याचे हे वैद्यकीय अधिकारी खासगीत बोलताना सांगतात. त्यामुळे शहरात डेंग्यूने पुणेकरांवर मृत्यूचे सावट घोंगावत असताना, ते रोखण्यासाठी असणारी आरोग्य विभागाची यंत्रणा इतरत्र व्यस्त असल्याने पुणेकर रामभरोसे असल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)