शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गावभेटींनी तापला राजकीय आखाडा

By admin | Updated: February 17, 2017 04:41 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे सध्या सर्वत्र सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या गावभेटी सुरू झाल्यामुळे गावागावांत

कुरकुंभ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे सध्या सर्वत्र सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या गावभेटी सुरू झाल्यामुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, अगदी खेड्यापाड्यांतून वाहनांवर भोंगे लावून, विविध गाण्यांद्वारे तसेच विविध प्रकारच्या चारोळ्यांच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडत आहे. गावातील प्रत्येक चौकात भोंगा लावलेल्या गाड्या उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत.कुरकुंभ (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी व रासपच्या उमेदवारांनी गावभेटीचे नियोजन केल्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार अगदी काही मिनिटांच्या फरकाने प्रत्येक घरात जाताना दिसत आहेत. त्यातच गुरुवार असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आठवडेबाजारामुळे सुटीवर असतात; त्यामुळे स्थानिक नेत्यांनी गुरुवारी गावभेट घेण्याचे नियोजन केले होते.कुरकुंभ येथील समस्या सोडविण्याचा निर्धार कुठल्याच पक्षाच्या प्रचार दौऱ्यात दिसला नाही. कुरकुंभ येथे गेल्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे भयंकर संकट निर्माण झाले होते; मात्र त्यावर कुठलाच पर्याय ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून केला गेला नाही. एकीकडे रासायनिक प्रदूषणामुळे दूषित झालेले पाणी व दुसरीकडे पाण्याच्या बाबतीत नियोजनाचा अभाव त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला होता. याही वर्षी परिस्थितीत काहीच बदल झाला नाही.