शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

एबी स्कॅन मशिनद्वारे लिंगनिदान

By admin | Updated: November 2, 2015 01:15 IST

महापालिकेच्या गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र विभागाने (पीसीपीएनडीटी सेल) गोपनीय पद्धतीने केलेल्या एका स्टिंग आॅपरेशनमध्ये नेत्रतज्ज्ञांकडील एबी स्कॅन

दीपक जाधव, पुणेमहापालिकेच्या गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र विभागाने (पीसीपीएनडीटी सेल) गोपनीय पद्धतीने केलेल्या एका स्टिंग आॅपरेशनमध्ये नेत्रतज्ज्ञांकडील एबी स्कॅन (एल्कॉन सर्जिकल अल्ट्रास्कॅन इमॅजिंग) मशिनद्वारे गर्भातील लिंगाचे अगदी स्पष्टपणे निदान होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एबी मशिनद्वारे गर्भ मुलाचा आहे की मुलीचा हे सहज ओळखता आले. याचा अहवाल आरोग्य विभागाच्या वतीने राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट १९९४ व २००३ च्या द्वारे सोनोग्राफी मशिनच्या वापरावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक सोनोग्राफी मशिनची आरोग्य विभागाकडे नोंदणी बंधनकारक आहे. तसेच या मशिनद्वारे होणाऱ्या प्रत्येक तपासणीची नोंद ठेवावी लागते. त्या तपासण्यांवर आरोग्य विभागाकडून बारीक लक्ष ठेवले जाते. नेत्ररोगतज्ज्ञांच्या एबी स्कॅन मशिनचीही नोंदणी व्हावी यासाठी पुण्याच्या पीसीपीएनडीटी सेलने प्रयत्न केले होते. त्याला नेत्ररोगतज्ज्ञांच्या संघटनेने विरोध करून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहेन्यायालयाने या मशिनची नोंदणी करण्यास तात्पुरती स्थगिती दिली असून, राज्य शासन व महापालिकेला बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर पीसीपीएनडीटी सेलने स्टिंग आॅपरेशन करून एबी स्कॅन मशिनद्वारे लिंगनिदान सहज शक्य असल्याचे उजेडात आणले आहे. राज्य कुटुंब कल्याण संचालनालयाचे अतिरिक्त संचालकांना तातडीने हा अहवाल पाठवून देण्यात आला आहे, उच्च न्यायालयामध्येही याचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.