शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

धनकवडीत लोकांच्या मदतीसाठी धावून आले गणेश मंडळ, कोरोनाच्या लढाईत रूग्णांना ऑक्सिजन बँकचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 16:16 IST

अखिल मोहननगर मित्र मंडळाचा उपक्रम

ठळक मुद्देएका ऑक्सिजन बँकमधून रुग्ण २५० वेळा ऑक्सिजन घेऊ शकतो

पुणे: पुण्यात सर्वत्र कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागल्याने त्यांना बेडची गरज भासू लागली आहे. पण बेड मिळवण्यासाठी तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक रुग्णालयातून तर वेटिंगचा बोर्ड दाखवला जात आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन पातळीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन बँकचा आधार देणारी नवी कल्पना धनकवडीतील एका मंडळाने शोधून काढली आहे. 

रुग्णाची ऑक्सिजन पातळी ८५ च्या पूढे असेल. त्याला बेड मिळण्यास अडचणी येत असल्यास ही बँक मदत करू शकते. त्याद्वारे चार तासापार्यंत रुग्ण श्वास घेऊ शकतो. अशा ऑक्सिजन बँक ना नफा ना तोटा या तत्वावर नागरिकांना देण्यात येत आहेत. तर गरजूना मोफत देण्याचे काम मंडळाकडून सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती अखिल मोहननगर मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष मयूर बुरसे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. मंडळाच्या एका कार्यकर्त्याला बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला. त्याची ऑक्सिजन पातळी उतरली होती. मंडळाच्या सदस्यांनी खूप प्रयत्न करूनही बेड मिळणे कठीण झाले होते. अनेक रुग्णालयात ते शोधण्यात वेळ गेला. त्या वेळात श्वासोच्छ्वासात खूप अडचणी आल्याने त्याने प्राण सोडला.  इतर रुग्णांना अशा समस्येला तोंड देताना अडचणी येऊ नये. म्हणून ऑक्सिजन बँकच्या या उपक्रमाला सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

एका ऑक्सिजन बँकमधून रुग्ण २५० वेळा ऑक्सिजन घेऊ शकतो. ती तब्बल चार तास चालते. मंडळाचे सर्व कार्यकर्ते या कामात गुंतले आहेत. गरजू लोकांना हा फ्री दिला जातो. तर ज्यांना आर्थिक अडचण नसेल. त्यांना ना नफा ना तोटा या किंमतीत विकत देण्यात येत आहे. 

बुरसे म्हणाले,  सद्यस्थितीत लोक ऑक्सिजनच्या बेडसाठी झगडत आहेत. त्यांना दिवसभर बेड मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. ऑक्सिजन बँकमुळे थोडाफार आराम मिळत असल्याचे रूग्णांनी सांगितले आहे. आम्ही आतापर्यंत २०० ते २५० नागरिकांना हे दिले आहे. या बँकच्या वापरामुळे ऑक्सिजन पातळी त्वरित वाढते. त्यामुळे रुग्णाची भीतीही निघून जाते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणाऱ्या परिस्थितीतून स्वतःला सावरण्यास मदत होते.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस