शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शौर्यपदकविजेत्यांना घरपट्टी माफ

By admin | Updated: October 14, 2016 05:05 IST

राष्ट्रपतींचे शौर्यपदक विजेते सैनिक, पोलीस यांना महापालिकेच्या हद्दीतील त्यांच्या एका मालमत्तेचा मिळकत कर कायमस्वरूपी माफ करण्याला

पुणे : राष्ट्रपतींचे शौर्यपदक विजेते सैनिक, पोलीस यांना महापालिकेच्या हद्दीतील त्यांच्या एका मालमत्तेचा मिळकत कर कायमस्वरूपी माफ करण्याला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने गुरुवारी संमती दिली. हा निर्णय घेऊन पालिकेने देशासाठी, नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्यांप्रति आदर व्यक्त केला आहे. पालिकेच्या सेवेतील अग्निशामक दलाच्या जवानांचाही यात समावेश करण्यात आला आहे.कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्यांच्या विधवा पत्नी अथवा नातेवाइकांच्या नावे जॉईंट मालमत्ता असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. दोन मालमत्ता असेल तर फक्त एकाच मालमत्तेचा कर माफ असेल. नगरसेवक अविनाश बागवे यांनी हा ठराव स्थायी समितीमध्ये आणला होता. त्याला तिथे मंजुरी मिळाल्यानंतर तो गुरुवारी सर्वसाधारण सभेत चर्चेला आला. विनाचर्चा त्याला मंजुरी मिळाली. राष्ट्रपतींचे शौर्यपदकविजेत्या पोलिसांचाही ते पालिका हद्दीत राहात असतील व त्यांची इथे मालमत्ता असेल तर तिचाही समावेश करण्याची उपसूचनाही या वेळी मंजूर करण्यात आली. अग्निशामक दलात राष्ट्रपतींचे शौयपदक विजेते ४ जवान आहेत. त्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळेल. त्यांच्या अथवा पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेचा कर कायमस्वरूपी माफ करण्यात येईल. तसेच पोलीस दलातही असे राष्ट्रपतींचे शौर्यपदक मिळालेले पोलीस आहेत. उपसूचनेमुळे त्यांचाही समावेश आता या निर्णयात झाला आहे. सभागृहाने एकमताने या विषयाला मंजुरी दिली. (प्रतिनिधी)