शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत कारखान्याचे भवितव्य आज ठरणार

By admin | Updated: April 21, 2017 06:00 IST

थेऊर येथील हवेली तालुक्याचे भूषण ठरलेला यशवंत सहकारी साखर कारखाना आहे. कारखाना बंद पडल्यानंतर, सहा वर्षांच्या काळातील सभासदांची ही तिसरी

उरुळी कांचन : थेऊर येथील हवेली तालुक्याचे भूषण ठरलेला यशवंत सहकारी साखर कारखाना आहे. कारखाना बंद पडल्यानंतर, सहा वर्षांच्या काळातील सभासदांची ही तिसरी सर्वसाधारण सभा कारखान्याचे भवितव्य ठरविण्याचा निर्णय घेण्यासाठी उद्या शुक्रवारी (दि. २१) होणार आहे.सध्या या कारखान्यावर सुमारे १०० कोटींचे जवळपास कर्ज आहे. केवळ माजी संचालक, माजी पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी वा या भागातील स्वयंघोषित पुढारी यांनीच त्या ठिकाणी बोलायचे व त्यांच्या नेत्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या वैयक्तिक आणि स्वत:च्या राजकीय गटाच्या फायद्याच्या तेवढ्या मांडायच्या व मंजूर करून घ्यायच्या, अशा प्रकारची ही वार्षिक सर्वसाधारण सभा होऊ नये, अशी मागणी या भागातील सभासद शेतकऱ्यांनी केली आहे. पूर्व हवेली तालुक्यातीलच नव्हे, तर कारखान्याच्या सुमारे २२ हजार शेतकरी सभासद, कामगार सभासद व अन्य कामगारबंधूंच्या हिताचे रक्षण करणारा निर्णय सर्व पातळ्यांवर सांगोपांग चर्चा होऊन होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, त्या ठिकाणी सर्व सामान्य शेतकरी सभासदाला त्याचे मत मांडून देण्यास प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर होणे गरजेचे आहे, अशी सभासदांची अपेक्षा आहे. मात्र उघडपणे नावानिशी बोलायला कुणी तयार नाही. येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत येणारे विषय हे यापूर्वीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी या पूर्वीच मंजूर केले असतानाही, परत त्याच विषयावर सर्वसाधारण सभा घेण्याचा घाट का घातला जातोय याची शंका सभासदांना सतावित आहे, यापूर्वी गरजेपुरत्या जमिनीची विक्री करायची व देणी भागवून कारखाना चालू करायचा, असा प्रस्ताव होता. पण,तो अस्तित्वात येऊ शकला नाही. यानंतर अनेक प्रस्ताव आले व गेले. पण, कारखाना चालू झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या खासगी कारखान्यांचा व गुऱ्हाळाचा आधार घेऊन उसाचे गाळप करून जे मिळेल ते पदरात पडून घेतले आहे.पाच ते सहा वर्षे झाली हा कारखाना बंद आहे. आता सभासदांची मागणी ही आहे की, कारखाना चालू करण्याच्या भानगडीत न पडता कारखाना भंगारात विकून व कारखान्याच्या मालकीची सर्व जमीन बांधकाम व्यावसायिक व कारखाना सभासद यांच्यातील कराराने विकसित करण्यास देऊन त्या ठिकाणी मगरपट्टा सिटीसारखा प्रकल्प उभारावा. त्यातून येणाऱ्या पैशातून सर्व देणी देऊन शिल्लक राहणारी रक्कम कायम मुदत ठेव म्हणून ठेवून येणारे व्याज सभासदांना लाभांश स्वरूपात देण्यात यावे, अशी भावना सभासदांनी बोलून दाखविली.