शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण

By admin | Updated: February 24, 2017 02:25 IST

बारामती मध्ये आज जाहीर झालेल्या जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुक निकालासाठीआज सकाळपासुनच

बारामती : बारामती मध्ये आज जाहीर झालेल्या जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुक निकालासाठीआज सकाळपासुनच कार्यकर्त्यांंनी गर्दी केली होती. गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आताषबाजीने भर उन्हात देखील कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष सुरुच होता.सकाळी ८ वाजल्यापासुनच एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाउनमधील मतमोजणी केंद्राच्या दिशेने कार्यकर्त्यांच्या वाहनांचे ताफे निघाले. ‘गुलाल आमचाच’ असा संदेश देवून कार्यकर्ते विजयोत्सवाच्या तयारीनिशी मतदान केंद्राबाहेर पोहचले. पहिलाच निकाल सुपे गटातील होता. मोजणी सुुरु झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु झाली. निवडणूक प्रचार काळात सुपा-मेडद गटात चुरशीची लढत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. पहिल्या फेरीतच राष्ट्रवादीचे भरत खैरे यांनी आघाडी मिळविली. दुसऱ्या फेरीत निर्णायक मते मिळवून विजयी मिळविला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला. त्यानंतर सुरु झालेला राष्ट्रवादीचा जल्लोष निक ाल जाहीर झाल्यानंतर देखील कायम होता. गुलालाची उधळण केल्याने सर्व कार्यकर्ते, रस्ते गुलालाने माखले होते. राष्ट्रवादीच्या एकापाठोपाठ एक विजयाच्या बातम्या बाहेर आल्या. त्या प्रमाणात जल्लोेष देखील वाढला. आवाज कोणाचा, आवाज राष्ट्रवादीचा, राष्ट्रवादीच पुन्हा, अजित पवार झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साह कमी नव्हता. आवडत्या उमेदवाराचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी ढोल ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ताल धरल्याचे चित्र होते.एका पाठोपाठ एक गट आणि गणातील निकाल राष्ट्रवादीच्या बाजुने मोठ्या मताधिक्याने लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. फक्त बारामतीचे बोला, बाकी ठिकाणी काय झाले याचे आम्हाला काय करायचे नाही, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते देत होते. थिरकली तरुणाई! राष्ट्रवादीचे फडकणारे झेंडे, गुलाल व भंडाऱ्याची उधळण, कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, बँजोच्या तालावर थिरकणारी तरुणाई असेच काहीसे चित्र आज आंबेगाव तालुक्यात होते. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. मंचर शहरात राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांची मिरवणूक निघाल्यानंतर अपक्ष विजयी उमेदवार राजाराम बाणखेले यांनी पारंपरिक वाद्याच्या साथीत मिरवणूक काढली.  घोडेगाव येथील मतमोजणी केंद्राबाहेर सकाळी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते. काहींच्या हातात पक्षाचे झेंडे होते.  निकाल जसजसा जाहीर होईल, तसतसा जल्लोष वाढत होता. निकालानंतर राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. .