शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुक्या कच-याची विल्हेवाट लावण्याची डोकेदुखी

By admin | Updated: February 12, 2015 02:33 IST

फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे बंद झाल्यापासून गेला दीड महिना शहरात दररोज निर्माण होणारा बाराशे

पुणे : फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे बंद झाल्यापासून गेला दीड महिना शहरात दररोज निर्माण होणारा बाराशे ते तेराशे टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिका प्रशासन पेलत आहे. सध्या सर्व ओला कचरा जिरविण्यात यश येत असले, तरी शिल्लक राहत असलेल्या मोठ्या प्रमाणातील सुक्या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. सुका कचरा उचलण्यासाठी कारखानदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.महापालिकेला फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोत कचरा टाकण्यास ३१ डिसेंबरची मुदत तेथील ग्रामस्थांनी दिली होती. त्यानुसार १ जानेवारीपासून तिथे कचरा टाकू देणे त्यांनी बंद केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आणखी ९ महिने कचरा टाकू देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. मात्र, त्यापूर्वी काही अटींची पूर्तता करण्यास ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे अजूनही त्यांनी कचरा टाकण्यास मान्यता दिलेली नाही.कचऱ्याचा प्रश्न भडकणार, हे लक्षात घेऊन प्रशासनाने अगोदरपासून बी प्लॅन तयार ठेवला होता. त्यानुसार कचऱ्याचे जास्तीत जास्त वर्गीकरण करून संपूर्ण ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था केली. शहराच्या जवळपास असणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलून खतनिर्मितीसाठी त्यांना ओला कचरा घेण्यासाठी तयार केले. ज्या शेतकऱ्यांनी यास मान्यता दिली, त्यांच्या शेतात मोठे खड्डे घेऊन त्यामध्ये ओला कचरा टाकला जात आहे. सुक्या कचऱ्यातील काही कचरा पुनर्वापरासाठी दिला जात आहे. तरीही मोठ्या प्रमाणात सुका कचरा शिल्लक राहत आहे. (प्रतिनिधी)