शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: November 10, 2015 01:37 IST

पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणारी वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूरसह रांजणगाव, सरदवाडी दरम्यानच्या सर्वच अतिक्रमणांवर दि. १७, २१, २४ नोव्हेंबरदरम्यान सार्वजनिक

कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणारी वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूरसह रांजणगाव, सरदवाडी दरम्यानच्या सर्वच अतिक्रमणांवर दि. १७, २१, २४ नोव्हेंबरदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हातोडा मारण्यात येणार आहे. सन २०१२ नंतरच महामार्गावर प्रथमच कारवाई होणार असल्याने अनेक वर्षांपासून औद्योगिक कारखानदारांच्या तक्रारीला यश आले असल्याने दिवाळीनंतर पुणे-नगर महामार्ग अतिक्रमणमुक्त झालेला दिसणार आहे.पुणे जिल्ह्यात पुणे-नगर महामार्गाचे चौपदरीकरण झाले. परंतु अनेक गावांमध्ये रस्ता अरुंद व त्यातच भर म्हणून बेशिस्त पार्किंग यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. रांजणगाव ते वाघोली या ३० किलोमीटर अंतर पार करण्यास पाच तास वेळ लागतो. या वाहतुककोंडी संदर्भात औद्योगिक कारखानदारांनी थेट मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.अनेक वर्षांपासून पुणे-नगर महामार्गावरील अतिक्रमणांबाबत वारंवार तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अतिक्रमणांवर हातोडा मारण्याचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने महामार्गावर रस्त्याच्या मध्यापासून १३ ते १५ मीटर क्षेत्रातील सर्वच अतिक्रमणांवर थेट जेसीबीच्या साहायाने कारवाई होणार असल्याचे सांगतानाच दि. १७ नोव्हेंबर रोजी वाघोली, लोणीकंद, दि. २१ नोव्हेंबर रोजी कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी, दि. २४ रोजी रांजणगाव, कारेगाव, सरदवाडी या गावांमध्ये ही कारवाई होणार असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.