शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन रजिस्ट्रेशनद्वारे तरुणाची फसवणूक

By admin | Updated: May 23, 2014 04:57 IST

नोकरीसाठी आॅनलाइन रजिस्ट्रेशनद्वारे पैसे भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील ‘आपका रोजगार सव्हिर्सेस’ या संस्थेला पुुणे जिल्हा ग्राहक न्याय मंचाने दंड सुनावला

पुणे : नोकरीसाठी आॅनलाइन रजिस्ट्रेशनद्वारे पैसे भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील ‘आपका रोजगार सव्हिर्सेस’ या संस्थेला पुुणे जिल्हा ग्राहक न्याय मंचाने दंड सुनावला. या संस्थेमुळे फसवणूक झालेल्या युवकाला ३४ हजार ४३२ रुपये परत देण्याचा आदेश मंचाने या संस्थेला दिला आहे. या प्रकरणी जगदीश वैद्य (रा. फुरसुंगी) यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. उत्तर प्रदेशमधील आपका रोजगार सव्हिर्सेस प्रा. लि. विरोधात वैद्य यांनी फसवणुकीची तक्रार केली होती. आॅनलाईन नोंदणी फी भरलेनंतर याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांना आधी सात दिवस, नंतर १५ आणि त्यानंतर २१ दिवसात त्यांना पैसे मिळतील असे सांगण्यात आले. मात्र त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. या प्रकरणी त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य गीता घाटगे यांनी कागदपत्रांचे अवलोकन करून निकाल दिला. संबंधित कंपनीला नोटीस बजावूनही मंचापुढे कोणी हजर राहिले नाही. तक्रारदाराने मंचापुढे शपथपत्र, क्रेडिट कार्ड खात्याचा उतारा, कंपनीला पाठविण्यात आलेले ई-मेलचा नकला सादर केल्या. कंपनीने पैसे घेऊनही सेवा दिलेली नाही त्यामुळे तक्रारदार ३४ हजार ४३२ रुपये मिळण्यास पात्र आहे, असे मंचाने निकालात नमूद केले आहे. तसेच शारिरिक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी पाच हजार रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला. (प्रतिनिधी)