शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

विद्यापीठाकडून पालिकेची फसवणूक

By admin | Updated: February 6, 2015 00:27 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक इमारती महापालिकेच्या बांधकाम विभागा कडून परवानगी न घेताच बांधण्यात आल्या;

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक इमारती महापालिकेच्या बांधकाम विभागा कडून परवानगी न घेताच बांधण्यात आल्या; तसेच या इमारतींचा कोणताही मिळकत कर विद्यापीठा कडून भरला जात नाही. अनेक वर्षांपासून विद्यापीठाने महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडविला असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीतून विद्यापीठातील या गैरकारभाराचा पर्दाफाश झालेला आहे. प्रा. अतुल बागुल यांनी महापालिका व पुणे विद्यापीठाकडून यासंदर्भातील माहिती मिळविली आहे. महापालिकेला अंधारात ठेवून विद्यापीठाने अनेक इमारती बांधल्या, त्यांचा वापरही सुरू केला. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील; तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याची काहीच माहिती नव्हती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नवीन इमारत बांधण्यापूर्वी त्याचा ले-आउट मंजूर करून घेणे, इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर मिळकत कर भरून भोगवटा पत्र घेणे बंधनकारक असते. सर्वसामान्य नागरिकांकडून याचे थोडेसेही उल्लंघन झाले, तर त्यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागते. विद्यापीठावर मात्र महापालिका प्रशासनाने विशेष मेहरनजर दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.विद्यापीठात बांधण्यात आलेल्या ११ इमारती कोणतीही बांधकाम परवानगीच न घेताच, त्या बांधण्यात आल्या. इतर ११ इमारतींना बांधकाम परवानगी घेण्यात आली; मात्र भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू करण्यात आला आहे. आणखी ११ इमारतींचे बांधकाम सध्या सुरू असून, त्याला परवानगी मिळालेली नसताना काम सुरू करण्यात आले आहे. या इमारतींच्या लाखो स्क्वेअर फूट बांधकामाचा मालमत्ता करच अनेक वर्षांपासून भरला गेला नसल्याने महापालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. विद्यापीठा कडून दंडासहित मिळकतकराची रक्कम वसूल करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि अतुल बागुल यांनी केली आहे. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.विद्यापीठाच्या इमारतींची तपासणीपुणे विद्यापीठातील इमारतींबाबत तक्रार मिळालेली आहे. त्यानुसार उद्या (शुक्रवारी) बांधकाम विभाग व मिळकत कर विभागाकडून संयुक्तपणे तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये तथ्य आढळून आल्यास, दंडात्मक कारवाई केली जाईल.-सुहास मापारी, उपायुक्त मिळकत कर विभागपरवानगी न घेता काम सुरू असलेल्या इमारती४कॅप भवन, लेडीज हॉस्टेल, बॉइज हॉस्टेल, अ‍ॅकॅडमिक स्टाफ कॉलेज अँड हॉस्टेल, एज्युकेशन डिर्पाटमेंट, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग.