शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चार वाहने आदळली; वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: October 27, 2014 03:34 IST

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत चार गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता

पेठ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत चार गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणीही जास्त जखमी झाले नाहीत. मात्र, वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनचालकांना, प्रवाशांना या वाहतूककोंडीचा चांगलाच फटका बसला. पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावर पुण्याच्या दिशेने चाललेल्या गाड्या एकमेकांवर पाठीमागून आदळल्याने अपघात झाला. या अपघातग्रस्त गाड्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवाजीनगर आगाराची एसटी बस, पिकअप गाडी क्र. एमएच ०६ एजी ३९७८, कार एमएच १४ बीसी ९८६४ व कार एमएच १४ इएच १५९९ या गाड्या एकमेकांवर पाठीमागून आदळल्याने अपघात झाला. अपघातात कोणीही जास्त जखमी झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सायंकाळची वेळ असल्याकारणाने या ठिकाणी लवकरच अंधार पडला होता. त्यामुळे अपघात झाल्यानंतर या ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीची खूप मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. पेठ गावातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन वाहतूककोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आळेफाटा महामार्गाचे वाहतूक पोलीस घटनास्थळी येऊन त्यांनी घटनास्थळाचा ताबा घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पुण्यावरून येणाऱ्या गाड्यांना पेठ गावातून सोडून अपघात झालेल्या महामार्गावरून फक्त पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली. सुमारे दोन तास वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालकांना, प्रवाशांना ताटकळतच गाडीत बराच वेळ बसावे लागले. (वार्ताहर)