शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगाव वारुळवाडी गटात चौरंगी लढत

By admin | Updated: February 15, 2017 01:51 IST

नारायणगाव-वारुळवाडी गटात विद्यमान जि़ प़ सदस्या आशाताई बुचके, माजी जि. प. सदस्या राजश्री बोरकर, अपक्ष उमदेवार सोनाली

नारायणगाव : नारायणगाव-वारुळवाडी गटात विद्यमान जि़ प़ सदस्या आशाताई बुचके, माजी जि. प. सदस्या राजश्री बोरकर, अपक्ष उमदेवार सोनाली पाटे व भाजपाच्या मनीषा पारेकर अशी चौरंगी लढत या गटात आहे़ आशाताई बुचके आपला मतदार संघ सोडून या गटातून निवडणूक लढवीत असल्याने या गटाची लढत प्रतिष्ठेची व अटीतटीची झाली आहे़ या गटाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ नारायणगाव-वारुळवाडी गट सर्वसाधारण महिला राखीव गटासाठी आरक्षित झाल्याने आशाताई बुचके, राजश्री बोरकर व सोनाली पाटे यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे़ बुचके या तालुक्यातील उमेदवारांच्या जाहीर सभा घेत असल्याने नारायणगाव-वारुळवाडी गटातील प्रचार त्यांची मुलगी व सर्व शिवसैनिक करीत आहेत. पंचायत समितीच्या वारुळवाडी गणात रमेश खुडे या मांजरवाडी येथील तरुणाला संधी दिली आहे, तर नारायणगाव गणातून अर्चना माळवदकर या निवडणूक रिंगणात आहेत़ राष्ट्रवादीच्या राजश्री बोरकर व वारुळवाडी गणातील सुशील सोनवणे, नारायणगाव गणातील प्रीती कोल्हे यांना नातेसंबंध व महिलामंडळाचे जाळे मोठे असल्याने राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा संधी दिली आहे़ त्यांनी बुचके यांना चांगलेच आव्हान दिले आहे़ मनसेचे उपजिल्हाप्रमुख मकरंद पाटे यांच्या पत्नी सोनाली पाटे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण करून दुसरी फेरी सुरू केली आहे़ प्रत्येक मतदाराशी संपर्क केल्याने त्यांनीदेखील निवडणुकीत आव्हान निर्माण केले आहे. कॉँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहिर केली होती. परंतू माघारीच्या दिवशी नलिनी को-हाळे यांनी माघार घेतल्याने याचा लाभ राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. सत्यशिल शेरकर आणि राजश्री बोरकर यांचे जवळचे नातेसंबंध असल्याने या ठिकाणची उमेदवारी काँगे्रसने मागे घेतली अशी चर्चा या गटात सुरू आहे. तर भाजपाने मनीषा पारेकर यांना संधी दिली आहे. (वार्ताहर)