शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील चौघे ताब्यात

By admin | Updated: March 30, 2015 00:11 IST

मिरज दरोडा प्रकरण : धागेदोरे सापडले; परिचिताकडून टीप देऊन लुटीचा प्रकार

मिरज : मिरजेत धान्य व रॉकेल विक्रेते अभिजित ऊर्फ आबा जाधव यांच्या घरावर दरोडा टाकून १२ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या तोतया प्राप्तिकर व पोलीस अधिकाऱ्यांच्या टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पुणे व परिसरातील चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अभिजित जाधव यांच्या एका परिचिताने टीप देऊन लुटीचा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.सात ते आठजणांच्या टोळीने प्राप्तिकर व पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून शुक्रवारी रात्री आबा जाधव यांच्या कुटुंबीयांना कारवाईची धमकी व मारहाण करून घरातील बारा लाखांचे दागिने व रोख रक्कम लुटली. तोतया अधिकाऱ्यांनी भरवस्तीत जाधव कुटुंबीयांना मारहाण करून दरोडा टाकल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली होती. शहर पोलिसांसह गुंडाविरोधी पथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक चोरीच्या तपासासाठी कामाला लागले आहे. चोरटे घेऊन गेलेले जाधव कुटुंबीयांचे मोबाईल व वाहन क्रमांकावरून चोरट्यांचा शोध घेण्याचा युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना पुणे व परिसरातील चार संशयित मिरजेतील दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. पथकाने तातडीने हालचाल करून संबंधित गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. आबा जाधव यांच्या एका परिचिताकडून टीप घेऊन दरोड्याचा प्रकार केल्याची कबुली त्यांनी दिल्याची माहिती मिळाली. टोळीतील अन्य सदस्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (वार्ताहर)संशयित आरोपींची कसून चौकशीजिल्ह्यात अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा घडल्यानंतर २४ तासांत संशयितांचा शोध लागल्याने दरोडेखोरांच्या टोळीतील इतर सदस्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. जाधव कुटुंबीयांच्या माहितीनुसार पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी चक्रे फिरविल्यामुळे संशयित टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ताब्यात घेतलेल्या चौघांची चौकशी सुरू असून, चौकशीनंतर त्यांना गुन्हा करण्यास कोणी मदत केली, माहिती दिली, हे स्पष्ट होणार आहे.