पिंपरी : बीआरटीतील खड्डे बुजविण्याच्या सुमारे चार कोटींच्या विषयासह पाच विषय स्थायी समितीत आयत्यावेळी मंजूर करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सारथी उपक्रमाच्या जागेत पुणे महापालिकेचे कॉल सेंटर सुरू करण्यास व त्यासाठी सॉफ्टवेअर व सर्व्हर ६ महिन्यांसाठी वापरण्यास मान्यता देण्याचा निर्णय ही झाला. स्थायी समितीची सभा आज झाली. अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते. नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस कॉरिडॉरवरील विविध सेवावाहिन्यांसाठी खोदलेला रस्ता, फुटपाथचे चर पूर्ववत करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३ कोटी ८६ लाख रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता दिली.पुनावळे येथील पाण्याच्या उंच टाकीचे आऊटलेट हायवे क्रॉसिंग करून जुन्या लाइनला जोडण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३९ लाख ८५ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता दिली. अशुद्ध जलउपसा केंद्र, रावेत येथे एपीएफसी पॅनल बसविण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३१ लाख रुपयांच्या प्रभाग क्र १७ मधील संभाजी चौक ते म्हाळसाकांत चौकापर्यंतच्या रस्त्यास आयआरएसप्रमाणे फुटपाथ तयार करण्यासाठी, तसेच आनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १९ लाख ६४ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.(प्रतिनिधी)
बीआरटीतील खड्डे बुजवायला चार कोटी
By admin | Updated: August 12, 2015 04:36 IST