शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तीव्र मधुमेहाच्या बरोबरच ताप आणि कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पेशंटची तब्येत गंभीर बनली. त्यामुळे त्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तीव्र मधुमेहाच्या बरोबरच ताप आणि कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पेशंटची तब्येत गंभीर बनली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तुमच्यामुळे पेशंट व्हेंटिलेटरवर गेला, असे म्हणून डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

असिफ कादीर शेख (वय ३३, रा. नयन अपार्टमेंट, अशोका म्युज, कोंढवा), जैद जुनेद घोडके (वय २०, रा. मिठानगर, कोंढवा), अफाक अफताब फराश (वय २२, रा. मिठानगर, कोंढवा) आणि अंजिक्य दत्तात्रय भांगे (वय २८, रा. नयन अपार्टमेंट, अशोका म्युज, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना इनामदार हॉस्पिटलमधील कोविड १९ सेंटरच्या जवळ २५ मार्च रोजी घडली होती.

याप्रकरणी डॉ़ सुहेल खान (वय ३७, रा. कोंढवा) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. खान यांचे कोंढव्यात सना हॉस्पिटल आहे. त्यांचा एक नेहमीचा ३८ वर्षांचा रुगण आजारी असल्याने १३ मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये आला होता. तो गोळ्या घेऊन गेला. तेव्हा डॉक्टरांनी त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. पण त्याने तो मानला नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. तेव्हा त्याला खूप ताप आला होता. तसेच शुगरही वाढली होती. त्यामुळे त्यांनी त्याला दाखल करुन घेतले. नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. त्या अनुशंगाने त्याच्यावर उपचार सुरू केले. २१ मार्च रोजी त्याला इनामदार हॉस्पिटलमध्ये बेड मिळाल्याने तेथे हलविण्यात आले. रुग्णाची काहीही माहिती मिळत नाही. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, इतकीच माहिती हॉस्पिटलकडून दिली जाते असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना इनामदार हॉस्पिटलमध्ये येण्याची विनंती केली. त्यानुसार २५ मार्चला रात्री साडेदहा वाजता डॉक्टर खान नातेवाईकांबरोबर इनामदार हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी रुग्णाची भेट घेऊन डॉक्टरांकडून प्रकृतीची माहिती घेतली. त्याची फाईल पाहिली. त्यानुसार त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. खाली येऊन त्यांनी ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना सांगितली. त्याचवेळी असिफ शेख व त्याचे तीन मित्र तेथे आले. तुमच्यामुळे आमचा पेशंट व्हेंटिलेटरवर गेला असे सांगून त्यांनी डॉक्टरांच्या मामाला मारहाण केली. डॉक्टर खान यांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वानवडी पोलिसांनी असिफ शेख सह त्याच्या मित्रांना अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.