शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार एकर उसाला आग

By admin | Updated: November 11, 2015 01:35 IST

राजेगाव (ता. दौंड) परिसरातील मेंगावडेवस्ती येथील तोडणीसाठी आलेल्या आडसाली उसाला मेनलाईनच्या वीजवाहक करणाऱ्या तारांना शॉर्टसर्किट झाल्याने साडेचार

राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) परिसरातील मेंगावडेवस्ती येथील तोडणीसाठी आलेल्या आडसाली उसाला मेनलाईनच्या वीजवाहक करणाऱ्या तारांना शॉर्टसर्किट झाल्याने साडेचार एकर ऊस जळून खाक झाला. गट नंबर ३६ मधील सर्जेराव मेंगावडे यांच्या मालकीचा दीड एकर, जगन्नाथ मेंगावडे यांच्या मालकीचा अर्धा एकर, गट नंबर ४३५ मधील शामराव ढमे यांच्या मालकीचा ३0 गुंठे, आत्माराम ढमे यांच्या मालकीचा ३0 गुंठे आणि श्रीकांत राऊत यांच्या मालकीचा एक एकर असा एकूण साडेचार एकर ऊस जळून खाक झाला आहे.ऊसजळीत झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार राजेगाव परिसरातील मेंगावडेवस्ती येथील जगन्नाथ मेंगावडे यांच्या शेतातून मेनलाईटच्या वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. तेथे २२ केव्हीच्या खानवटे फिडरचा कटपॉईंट आहे. या कटपॉईंट असणाऱ्या विजेच्या मेनलाईटच्या खांबावर वीज आल्यानंतर शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडतात, अशी तोंडी तक्रार वारंवार वीज महामंडळाकडे संबंधित शेतकऱ्यांनी केलेली होती. तोंडी तक्रारीनंतर दोन - तीन वेळा वायरमन येऊन तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करून गेलेले होते. त्यामुळे सदरचे नुकसान वीजवाहक करणाऱ्या तारा शॉर्टसर्किट होऊनच झाल्याचे ठाम मत येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. जळीत घटनेनंतर महसूल विभागाच्या वतीने तातडीने पंचनामा केला आहे. सदर जळीत झालेला सर्वच ऊस आडसाली ऊस असून तोडणीसाठी योग्य झालेला ऊस होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे मत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले. वीज मंडळाच्या वतीने देऊळगावराजे महावितरणच्या शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता विशाल सोनवणे, वायरमन अंकुश ढमे, गुणवरे व पोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.