शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

माजी अध्यक्षाला अटक

By admin | Updated: February 15, 2017 02:31 IST

गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना तब्बल ६ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष

पुणे : गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना तब्बल ६ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष जयवंत पाटील यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली असून न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयवंत काशिनाथ पाटील (वय ६१, रा. ए/९, श्री चिंतामणी कॉम्प्लेक्स, मयूर कॉलनी, कोथरूड) असे त्यांचे नाव आहे. यापूर्वी शरद व्यंकटेश कुलकर्णी (वय ४४, रा. शाहूनगर, जयसिंगपूर, कोल्हापूर), प्रमोद बाळकृष्ण चव्हाण (वय ४४, रा. मगदूम सोसायटी, जयसिंगपूर, कोल्हापूर), प्रसाद प्रभाकर वाळवेकर (रा. बालाजीनगर, धनकवडी) यांना अटक करण्यात आलेली आहे. यातील कुलकर्णी आणि चव्हाण या दोघांना २५ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, तर वाळवेकर याला १६ जून २०१४ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. याप्रकरणी आशुतोष सदाशिव कुलकर्णी (वय ४२, रा. रघुकुल सोसायटी, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार २० जानेवारी ते २१ डिसेंबर २०१२ दरम्यान घडला होता. आरोपींनी साई एक्स्पोर्ट कंपनीमार्फत दुबईमधील व्यापाऱ्यांना भाजीपाला निर्यात करीत असल्याचे तसेच मोठी आॅर्डर मिळाल्याचे सांगितले होते. भांडवल कमी पडत असल्याचे सांगत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यावर दरमहा सात टक्के परतावा देण्याचे आमिषही दाखवले होते. परंतु, या कंपनीकडे निर्यात परवाना नसल्याने सांगली येथे श्री साई नावाची नवीन कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून वेळोवेळी ८६ लाख, तर इतर गुंतवणूकदारांकडून असे मिळून ६ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये चेक तसेच रोखीने घेतले. मात्र, परतावा तसेच गुंतवलेली रक्कम परत न देता फसवणूक करण्यात आली.(प्रतिनिधी)