शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदार संजय काकडे यांना अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तळोजा तुरुंगातून सुटलेला गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणूक काढण्याच्या कटात सहभाग घेऊन गुन्हेगारांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तळोजा तुरुंगातून सुटलेला गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणूक काढण्याच्या कटात सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. तेथे काही तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने काकडे यांची २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सायंकाळी ५ वाजता सुटका केली.

तळोजा कारागृहातून १५ फेब्रुवारी रोजी सुटल्यानंतर गुंड गजानन मारणे याची त्याच्या साथीदारांनी सुमारे २०० ते ३०० मोटारीच्या सहाय्या मिरवणूक काढली होती. त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. त्यानंतर गजानन मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणात २३ फेब्रुवारी रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष शाखेच्या सोशल मीडिया सेलचे पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी फिर्याद दिली होती. संघटित गुन्हेगारांना पडद्याआडून मदत केल्याच्या संशयावरुन गेल्या महिन्यात २३ मार्च रोजी पोलिसांनी संजय काकडे यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून चौकशी केली होती. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.

गजानन मारणे व त्यांच्या समर्थकांची जनतेचे मनामध्ये दहशत रहावी, म्हणून कट करू यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनियोजन पूर्वक तळोजा जेल ते कोथरूड अशा वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ व्हायरल करून त्यावर कमेंट पोस्ट करून पुण्यातील नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करून त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होईल, असे वातावरण तयार करून संबंधित केसमधील साक्षीदार व अन्यायग्रस्त तक्रारदारांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले होतो.

माजी खासदार संजय काकडे व गजानन मारणे यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्याअनुषंगाने काकडे यांच्याकडे सखोल तपास करायचा आहे. या गुन्ह्याचा कट कोणत्या ठिकाणी रचला?, या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे?, या गुन्ह्याचा कट रचण्यामागे अटक आरोपीचा नक्की काय उद्देश आहे?, याबाबत काकडे यांच्याकडे तपास करायचा आहे. तसेच अटक आरोपींनी सोशल मीडियावर दहशत पसरविण्यासाठी कोणकोणत्या साथीदारांची मदत घेतली?, त्यांचा गुन्ह्याशी काय संबंध आहे?, याबाबत तपास करण्यासाठी काकडे यांना ५ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एस. पी. सावंत यांनी केली.

काकडे यांच्यावतीने अ‍ॅड. चिन्मय इनामदार आणि अ‍ॅड. विजयसिंग ठोंबरे यांनी बाजू मांडली. महापालिका निवडणुका जवळ आल्याने मागील निवडणुकीतील काकडे यांचा सहभाग पाहून केवळ राजकीय द्वेषापोटी हा खोटा गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई झाली आहे. काकडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन न करता त्यांना अटक करण्यात आली आहे. काकडे यांचा मारणेशी काहीही संबंध नाही, असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने काकडे यांचा जामीन मंजूर केला.

.........