शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुगल इमेजद्वारे प्रारूप वॉर्ड रचना

By admin | Updated: April 25, 2015 05:11 IST

महानगरपालिकेची २०१७ची निवडणूक एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीनुसार होणार असून, २०११च्या गुगल इमेजनुसार डिजिटलायजेशनद्वारे वॉर्ड रचना होणार आहे.

पिंपरी : महानगरपालिकेची २०१७ची निवडणूक एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीनुसार होणार असून, २०११च्या गुगल इमेजनुसार डिजिटलायजेशनद्वारे वॉर्ड रचना होणार आहे. एप्रिल महिना अखेरीस होणाऱ्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. महापालिकेची निवडणुकीची उत्सुकता शहरातील विविध राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते, इच्छुकांना लागली आहे. वॉर्डनुसार निवडणूक होणार असल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१२ची निवडणूक ही प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. २०१७ची निवडणूक वॉर्ड पद्धतीनुसार करण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने कामकाज सुरू केले आहे. हस्तक्षेपावर नियंत्रण येणारनिवडणूक आयोगाने प्रभाग किंवा वॉर्डनुसार निवडणूक घेण्याचे जाहीर केल्यानंतर प्रारूप वार्ड रचना करतात. या कामासाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी विभागांचे नकाशे यानुसार वॉर्डांची सीमा निश्चिती करीत असतात. मात्र, नवीन वॉर्ड रचना ही डिजिटलायजेशनद्वारे होणार आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होत असे. त्या राजकीय हस्तक्षेपावर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे हे काम आता गुगल इमेजद्वारे होणार आहे. २०११च्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १७ लाख २७ हजार २९२ एवढी आहे. त्यानुसार लोकसंख्येचे ३१०२ गट पाडण्यात आले होते. याच कालखंडातील गुगल इमेज घेऊन परिसराचे गट पाडण्यात येणार आहेत. गटानुसार प्रारूप वॉर्ड रचना तयार केली जाणार आहे. साधारणपणे तेरा ते पंधरा हजार लोकसंख्येचा एक वॉर्ड असेल. पुन्हा वॉर्डनुसार रचना २००२ची महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. त्या वेळी ३५ प्रभाग होते. त्यानंतर २००६च्या निवडणुकीत १०५ वॉर्ड होते. त्यानंतर २०१२ची निवडणूक प्रभाग रचनेनुसार झाली होती. ६४ प्रभागांत १२८ वॉर्डांचा समावेश होता.आॅनलाईन नामनिर्देशन पत्र निवडणुकीसंदर्भातील कामकाज तीन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात प्रारूप वॉर्ड रचना, दुसऱ्या टप्प्यात गटानुसार कुटुंबजोड, तिसऱ्या टप्प्यात वॉर्ड रचनेचे संगणकीकरण होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत संगणकाचा वापर केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकृती, विविध प्रकारची कागदपत्रे आॅनलाईन सादर करावी लागणार आहेत. वॉर्ड रचनेनुसार एप्रिलअखेर संगणक विभागांतील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. (प्रतिनिधी)