शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंडळांना पोलिसांकडूनच बळ

By admin | Updated: September 12, 2014 03:31 IST

कानी पडणारा डीजेचा दणदणाट आणि टोलचा घुमलेला आवाज असे असतानाही संपूर्ण विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला नाही.

मंगेश पांडे, पिंपरीकानी पडणारा डीजेचा दणदणाट आणि टोलचा घुमलेला आवाज असे असतानाही संपूर्ण विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला नाही. आवाज ऐकू येत असतानाही कारवाई होत नसल्याने एकप्रकारे मंडळांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडूनच बळ दिले जात असल्याचे स्पष्ट होते. परिमंडळ तीन हद्दीतील एकाही पोलीस ठाण्याकडून डेसिबलचे उल्लंघन केल्याबाबतची कारवाई झालेली नाही. गणेशोत्सव व्यवस्थित पार पाडा, गोंधळ घालू नका, सतर्क रहा, डीजेंचा वापर करू नका यांना अनेक सूचना पोलीस अधिकाऱ्यांकडून गणेशोत्सवापूर्वी मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिल्या जातात. वारंवार बैठका घेतल्या जातात. सूचना न पाळल्यास कारवाई करू. मिरवणुकीस परवानगी देणार नाही, असे सुनावले जाते. मात्र, प्रत्यक्षात मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट सुरू असतो. त्या वेळी मात्र कारवाईसाठी पोलीस धजावत नाहीत. न्यायालयाने आवाजाच्या मर्यादा घालून दिल्या आहेत. या मर्यादेचे पालन करूनच ध्वनिक्षेपक लावावेत, असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पोलिसांकडून केवळ औपचारिकता म्हणून मंडळांना सूचना दिल्या जातात. पोलिसांचा फौजफाटा केवळ बंदोबस्तासाठीच असतो का, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. डेसिबल मोजण्याचे यंत्र पोलिसांना दिले जाते. मात्र, केवळ शोभेची वस्तू म्हणूनच ते हाताळले जाते. मंडळांवर कारवाई करण्यासाठी पोलीस पुढे येतच नाहीत. कार्यकर्त्यांकडून उत्सवाच्या अगोदरच लाख, दोन लाख रुपये मोजून साऊंडच्या मोठ्या भिंती असलेले डीजेंचे बुकिंग केले जाते. मिरवणुकीत मोठ्या दिमाखात डीजेंचा दणदणाट सुरू असतो. बंदोबस्तावर असलेले पोलीस हे सर्व डोळ्याने पाहत असतात आणि कानाने ऐकत असतात; मात्र जणूकाही ऐकायलाच येत अशीच भूमिका पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत घेतल्याचे पहायला मिळाले. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, सांगवी, हिंजवडी अशी ७ पोलीस ठाणी येतात. या ठाण्यांच्या हद्दीत १४०८ मंडळांनी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली होती.