शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

फेररचना, आरक्षणाकडे लक्ष!

By admin | Updated: August 20, 2016 05:18 IST

फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अखेर गट-गणांची रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी ९ सप्टेंबर

पुणे : फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अखेर गट-गणांची रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी ९ सप्टेंबर रोजी आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचना जाहीर करणार असून, हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर जिल्हाधिकारी २५ नोव्हेंबर २०१६ रोजी अंतिम गट-गण रचना जाहीर करणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि तब्बल २९७ पंचायत समितींच्या निवडणुका सन २०१७ मध्ये होणार आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषद व १३ पंचायत समितींसाठी फेबु्रवारी-मार्चमध्ये निवडणूक होणार आहे. या वेळी सन २०११ च्या जनगणनेनुसार निवडणुका होणार असल्याने गट-गणांची फेररचना करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपरिषदांमुळे जिल्हा परिषदेच्या गट-गणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे नव्याने होणाऱ्या गट-गणांच्या रचनेकडे इच्छुकांसह सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. गट-गणांचे आरक्षण जाहीर करताना चक्रानुक्रमे फिरविण्यात येणार आहे. यामध्ये फेररचनेमध्ये गट-गणांमध्ये बदल झाला तरी आरक्षण टाकताना सन २००२, २००७ आणि सन २०१२ चे आरक्षण गृहीत धरून या वेळचे आरक्षण फिरविण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)सॅटेलाइट व गुगल मॅपचा वापर करून होणार फेररचनागट-गणांची फेररचना करताना सीमारेषा निश्चित करण्यासाठी या वेळी प्रथमच गुगल मॅप व सॅटेलाइटचा वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १० नगर परिषदांची प्रभागरचना निश्चित करताना याचा उपयोग करण्यात आला. गुगल मॅपचा वापर केल्याने या प्रभागरचना तंतोतंत करण्यासाठी प्रशासनाला मदत झाली. याच धर्तीवर आता गट-गणांची फेररचना करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.जिल्हा परिषद व १३ पंचायत समितीच्या गट-गणांच्या फेररचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-९ सप्टेंबर २०१६ : प्रारूप प्रभागरचना जाहीर करणे.२३ सप्टेंबर २०१६ : प्रारूप प्रभागरचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांची मान्यता घेणे. २८ सप्टेंबर : आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे. ५ आॅक्टोबर : प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढणे.१० आॅक्टोबर : प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे. २० आॅक्टोबर : आरक्षण व फेररचनेबाबत हरकती व सूचना सादर करणे. १७ नोव्हेंबर : हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे- २५ नोव्हेंबर : अंतिम गट-गणांची प्रभागरचना व आरक्षणे जाहीर करणे.